उमवितील विद्यार्थीनींसाठीच्या योग शिबीराचा समारोप

0

जळगाव । उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ व मुळजी जेठा महाविद्यालयातील योग विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यापीठ वसतिगृहातील विद्यार्थिनींसाठी आयोजित योग शिबीराचा समारोप शुक्रवारी 31 मार्च रोजी विद्यापीठाच्या दीक्षांत सभागृहात झाला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कुलगुरु प्रा.पी.पी.पाटील होते. प्रमुख अतिथी म्हणून के.सी.ई. सोसायटीचे अध्यक्ष नंदकुमार बेंडाळे होते.

शिबीर यशस्वितेसाठी यांनी घेतले परीश्रम
यावेळी मंचावर मु.जे.महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.उदय कुलकर्णी, प्रा.पी.पी.माहुलीकर, प्रभारी कुलसचिव प्रा.ए.बी.चौधरी, योग विभागप्रमुख प्रा.आरती गोरे, वसतिगृह रेक्टर प्रा.रत्नमाला बेंद्रे यांची उपस्थिती होती. यावेळी बोलताना डॉ.बेंडाळे यांनी योग शब्दाचा वास्तविक अर्थ आणि योगाचा मुळ उद्देश स्पष्ट केला. अध्यक्षीय भाषणात कुलगुरु प्रा.पी.पी.पाटील म्हणाले की, घरापासून दूर राहणार्‍या विद्यार्थिनींमध्ये अधिक सकारात्मकता वाढावी, त्या आनंदी राहाव्यात यासाठीच विद्यापीठाने हे शिबिर आयोजित केले होते. भविष्यातही अशा प्रकारचे शिबिर वेळोवेळी आयोजित करण्याचा विद्यापीठाचा प्रयत्न राहिल. प्रारंभी प्रा.आरती गोरे यांनी प्रास्ताविक केले. देवानंद सोनार यांनी सुत्रसंचालन केले. डॉ.रत्नमाला बेंद्रे यांनी आभार मानले. रत्नप्रभा चौधरी यांनी शांतीपाठ व प्रार्थना सादर केली. योग शिक्षिका गितांजली भंगाळे, रत्नप्रभा चौधरी, तृप्ती बोरोले यांना प्रमाणपत्र देण्यात आले. सहभागी विद्यार्थिनींना प्रमाणपत्र देण्यात आले. वौशाली शर्मा, कृपाली बर्डे यांनी शिबिरार्थींच्या वतीने मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी इंजि.राजेश पाटील, मिनाक्षी पाटील, अरुण सपकाळे, वाल्मिक पाटील, दिलीप सोनवणे, यशवंत गरुड, सुनिल चव्हाण, राजेश अवचारे यांनी सहकार्य केले.