जळगाव। उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ हे जळगाव शहरापासून 10 ते 12 किलोमिटर दुर वसलेले आहे. विद्यापीठ परिसर हा डोंगराळ भाग आहे. हा परिसरात निसर्गरम्य वातावरणांनी नटलेला आहे. विद्यापीठातील वृक्ष, पशु, पक्षी वाचविण्यासाठी विद्यापीठाला अथक परिश्रम करावे लागते. विद्यापीठ परिसरातील पाण्यात क्षारचे प्रमाण अधिक आहे. क्षारचे प्रमाण जास्त असल्याने सर्व प्रशाळा, विभाग, वसतीगृहात शुध्द पाणी पुरवठेसाठी आर.ओ.मशिन बसविण्यात आलेले आहे. मात्र काही दिवसांपासून बहुतांश आर.ओ.मशिन बंद अवस्थेत आहे. त्यामुळे विद्यापीठ परिसरात अशुध्द पाण्याचा पुरवठा होत आहे. मशिन चालु केले जात नसल्याने नाईलाजास्तव प्रशासळेसह वसतीगृहातील विद्यार्थ्यांना शुध्द पाण्याची जार विकत घ्यावी लागत आहे. गेल्या महिन्याभरापासून पाणी विकत घेत असल्याची स्थिती दिसून येत आहे.
पाणी विक्रेत्यांना सुगीचे दिवस
उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातील वसतीगृहात 700-800 विद्यार्थी वास्तव्यास आहे. तसेच विद्यापीठात विविध विषयांचे प्रशाळा आहे. शुध्द पाणी पुरवठा होत नसल्याने वसतीगृहातील विद्यार्थ्यांना विकत पाण्याची जार विकत घ्यावी लागत आहे. एक जारची किंमत 30 रुपये आहे. विद्यार्थ्यांसह प्राध्यापक, कर्मचारी यांना देखील पाणी विकत घ्यावे लागत असल्याने पाणी विक्रेत्यांना सुगीचे दिवस आले आहे. पाणी विक्रेत्यांच्या धंद्याला विद्यापीठात उत आले आहे.
विद्यार्थ्यांना ‘किडनी स्टोन’चा त्रास
विद्यापीठ प्रशासनाने विद्यापीठाला आवश्यक पाण्याची व्यवस्था केलेली आहे. मात्र पाण्यात क्षारचे प्रमाण अधिक आहे. साठवलेल्या पाण्यात अक्षरशः क्षार तरंगलेले दिसतात. क्षार अधिक असल्याने विद्यार्थ्यांच्या जीवाला धोका उद्भवण्याची शक्यता आहे. काही विद्यार्थ्यांना किडनी स्टोन (मुतखडा)चा त्रास देखील सुरु झाला आहे. र्यंत घंटागाडी कचरा उचलण्यासाठी पाठविण्यात आली.
थंड पाण्यासाठी वणवण
मे महिना सुरु असून हा कालावधी परीक्षेचा असतो. विद्यापीठातील सर्व विभागाच्या परिक्षा सुरु असल्याने या ठिकाणी मोठ्या संख्येने विद्यार्थी येतात. उन्हाळा असल्याने उन्हाची तिव्रता वाढली आहे. उन्ह जास्त असल्याने थंड पाण्याची आवश्यकता असते. मात्र आर.ओ.मशिन बंद असल्याने थंड पाणी पुरवठा होत नसल्याने विद्यार्थ्यांची थंड पाण्यासाठी वणवण होत आहे.