उमवित दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

0

जळगाव । प्रसार माध्यम हा लोकशाहीचा चौथा आधार स्तंभ म्हणून ओळखला जातो. प्रसार माध्यमांनी आजपर्यत उपेक्षीत व तळागाळातील घटकांना न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे. उपेक्षीतांच्या विकासात नेहमीच माध्यमांची भुमिका महत्त्वाची राहिलेली आहे. महिला विकासातही माध्यमांनी महत्त्वाची भुमिका बजावलेली आहे. सर्वच प्रसार माध्यमांनी महिला विषयक प्रश्‍नांना स्थान देण्याचा प्रयत्न केला आहे. दरम्यान उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातील कला व मानस विद्याप्रशाळे अंतर्गत असलेल्या जनसंवाद आणि पत्रकारिता विभागातर्फे ‘महिला व माध्यम आज आणि उद्या’ या विषयावर राष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. 30 व 31 मार्च रोजी या परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. राष्ट्रीय परिषदेच्या पहिल्या दिवसाच्या पहिल्या सत्रात प्रमुख मार्गदर्शक म्हणून आयबीएन लोकमत चॅनेलच्या सहयोगी संपादक सुवर्णा जोशी उपस्थित राहणार आहे. टी.व्ही.चॅनेलमध्ये कार्यरत असलेल्या महिलांचे कार्य, संधी व तणाव या विषयावर ते मार्गदर्शन करणार आहे. दुसर्‍या सत्रातील मार्गदर्शक सह्याद्री टी.व्ही. चॅनेलच्या वृत्तनिवेदिका आराधना तुंगारे ह्या महिला आणि माध्यम या विषयावर मार्गदर्शन करणार आहे. पॅनेल चर्चेचे सत्राध्यक्ष म्हणून अ‍ॅड.सुशील अत्रे उपस्थित राहणार आहे.

शोधनिबंधाचे होणार वाचन
महिला आणि माध्यम या विषयारवरही राष्ट्रीय परिषद आयोजित करण्यात आल्याने महिला व माध्यम याविषयी असलेले शोध निबंधाचे वाचन यावेळी करण्यात येणार आहे. परिषदेच्या पहिल्या दिवशी शोधपत्राचे वाचन सत्राध्यक्ष गुजरात विश्‍वविद्यालय अहमदाबाद येथील प्रा.डॉ.पुनिता हरने करणार आहे तर दुसर्‍या सत्रातील शोध निबंधाचे वाचन वर्धा येथील महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विद्यालयातील जनसंवाद आणि पत्रकारिता विभागाचे प्रा.डॉ.अख्तर आलम हे करणार आहे. 31 रोजी होणार्‍या होणार्‍या सत्राचे शोधनिबंध वाचन सावित्रीबाई फुल विद्यापीठ पुणे येथील प्रा.संजय तांबट करणार आहे.

परिषदेचे नियोजन
उमवीच्या पत्रकारिता विभागातर्फे आयोजित दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे गेल्या काही दिवसांपासून नियोजन सुरु आहे. विद्यापीठाचे कुलगुरु प्रा.पी.पी.पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. परिषदेचे सचिव म्हणून विभागप्रमुख प्रा.डॉ.तुकाराम दौड, परिषद संयोजक म्हणून प्रा.डॉ.सुधीर भटकर तर समन्वयाचे काम प्रा.राहुल कापुरे, प्रा.संदिप केदार कामकाज पाहत आहे.