उमविविरोधात हायकोर्टात याचिका दाखल

0

जळगाव। प्रस्थापितांना नेहमी संधी दिली जाते मात्र नवीन पदवीधर मतदारांना नाकारले जात असल्याचा आरोप महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सचिव जमील देशपांडे यांनी पत्रकार परिषदेमध्ये केला .

नवीन विद्यापीठ कायद्याचा भंग झाल्याचा ठपकादेखील त्यांनी ठेवला, 2014-15 मधल्या मतदारांचे नुतनीकरण करावे अशी मागणी त्यांनी केली. विद्यापीठ प्राधिकरणाकडून निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर झाला नसताना मतदारांच्या याद्या तयार झाल्या कशा ? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. विद्यापीठाच्या कारभाराविरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. नवीन पदवीधर मतदारांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या लढाईत सामील होऊन पाठिंबा द्यावा असे आवाहन देशपांडे यांनी केले. विद्यापीठ कायद्याच्या कलम 147 नुसार छायांकित प्रत मागितली होती. मात्र ती विद्यापीठ प्रशासनाकडे नाही.