उमवि नंदुरबार आदिवासी क्षेत्र विकसीत करणार!

0

नंदुरबार । नंदूरबार जिल्ह्यात विद्यापीठाच्या आदिवासी अकादमीच्या माध्यमातून शहर व खेडे यातील सुविधांचे एकत्रिकरण (सिलेज) करुन आदिवासी क्षेत्र विकसित करण्यासाठी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठास राजीव गांधी विज्ञान व तंत्रज्ञान आयोग, मुंबई यांनी पूर्णत: सहकार्य करण्याची तयारी दर्शवली आहे. आयोगाचे अध्यक्ष तथा सुप्रसिध्द अणूशास्त्रज्ञ डॉ. अनिल काकोडकर यांच्या प्रमुख उपस्थितीत शनिवारी 23 डिसेंबर, 2017 रोजी विद्यापीठात दिवसभर झालेल्या बौठकीत या प्रस्तावावर चर्चा झाली.

नंदुरबारच्या सहकार्याने प्रकल्प
कुलगुरु प्रा. पी.पी. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली शनिवार या च्सिलेज बेसड् ट्रायबल एरिया डेव्हलपमेंट इन नंदूरबार डिस्ट्रक्ट या विषयावर डॉ. अनिल काकोडकर यांच्या उपस्थितीत उच्चस्तरीय समितीची बौठक झाली. राजीव गांधी विज्ञान व तंत्रज्ञान आयोगाच्या वतीने शहर व खेडे यांच्या सुविधांचे एकत्रिकरण करुन सिलेज बेसड् एरिया डेव्हलपमेंट हा प्रकल्प प्रायोगिक तत्त्वावर राज्याच्या काही भागात राबविला जात आहे. त्या भागातील स्वयंसेवी संस्था, महाविद्यालय व या प्रकल्पावर काम करणाज्या इतर काही संस्थांचे प्रतिनिधी या बौठकीत सहभागी झाले होते. विद्यापीठाच्या नंदुरबार येथील आदिवासी अकादमीतर्फे कृषी विज्ञान केंद्र, नंदुरबारच्या सहकार्याने राजीव गांधी विज्ञान व तंत्रज्ञान आयोगाच्या सहाय्याने हा प्रकल्प राबविण्याचे विचाराधीन असून त्यासाठी तयार करण्यात आलेल्या प्रस्तावावर यावेळी चर्चा झाली. यावेळी कृषी विज्ञान केंद्र नंदूरबारचे डॉ. गजानन डांगे यांनी नंदूरबार जिल्हा निवडीमागील पाश्वभूमी विशद केली. उदय पाचपोर, बायफचे प्रतिनिधी गिरीश सोहनी, सुधीर वागळे यांनीही आपले अनुभव मांडले.