‘आमु आखा’च्या आदिवासी संस्कृतीसोबत विद्यार्थ्यांचा जनसंवाद
जळगाव । उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ येथील जनसंवाद आणि पत्रकारिता विभागात अभ्यासाचा भाग म्हणून द्धितीय वर्षाच्या विद्यार्थ्यानी नुकतेच चोपडा तालुक्यातील मेलानेे परिसरातील आदिवासी पाडा येथे भेट देवून त्यांचा विविध माहीती जाणून घेतली. पाडाभेट साठी बोरअंजटी, वैजापूर, मेलाने, खैरखुरळी हे पाडे निवडण्यात आले होते. सर्वात आगोदर बोरअंजटी आदिवासी आश्रमशाळा येथे विद्यार्थानी भेट दिली. येथे आदिवासी सेवा मंडळ संचालित धनाजी नाना चौधरी ही आश्रमशाळाला भेट देणून त्यांची माहिती घेण्यात आली. या शाळेचा परिसर ५ हेक्टरमध्ये बनला असून येथे मुली आणि मुलांची आश्रमशाळा आहे.
विद्यार्थ्यांनी अभ्यासली आदीम संस्कृती
वैजापूर येथे आदिवासी कन्या आश्रमशाळाला भेट दिली. यावेळी एकुण ८०० विद्यार्थीनी होत्या. या आश्रमशाळेत शिक्षण सोबत क्रिडामध्ये देखील पुठै होत्या.यानंतर ची पाडा भेट ही मेलाने येथील झाली. येथे आदिवासीचे संस्कुती, पोशाख, खाणे पिणे, सण उत्सव याविषयी माहिती मिळाली. पाडाभेटसाठीचे सर्व आयोजन हे प्रा.विनोद निताळे आणि डॉ.सुधीर भटकर यांनी केले होते. या अभ्यास दौर्यात २५ प्रशिक्षणार्थी सहभागी होते.