जळगाव। प्रस्थापितांना नेहमी संधी दिली जाते मात्र नवीन पदवीधर मतदारांना नाकारले जात असल्याचा आरोप महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सचिव जमील देशपांडे यांनी आयोजित पत्रकार परिषदेमध्ये केला आहे. विद्यापीठा नवीन कायद्यानुसार कायद्याचे भंग झाल्याचा खुलासा देखील यावेळी त्यांनी केला, 2014-15 मधल्या मतदारांचे नुतनीकरण करावे अशी मागणी त्यांनी यावेळी केली. विद्यापीठ प्राधिकरण निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर झाला नसता मतदारांच्या याद्या तयार झाल्यास कशा ? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. विद्यापीठाच्या कारभारा विरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आल्याचे त्यांनी पत्रकार परिषदेमध्ये बोलताना सांगितले.
उच्च न्यायालयात याचिका दाखल
विद्यापीठात नवीन मतदारांना संधी नसून प्रस्थापित पुन्हा निवडणुका लढविणार असून नवीन पदवीधर मतदारांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या लढाईत सामील होऊन पाठींबा द्यावा असे आवाहन देशपांडे यांनी केले. अभ्यासू लोक विद्यापीठा मध्ये निवडून पाठवायचे आहे. कलम 147 च्यानुसार छायांकित प्रत त्यांना सांगितली. मात्र ते देखील त्यांच्याकडे नाही. यासाठी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली गेली असून त्याचे कामकाज अॅड. गिरीश नागोरी हे पाहणार आहेत.
माहिती देण्यास टाळाटाळ
2016 च्या कायद्यानुसार पदवीधर मतदारांचे नुतनीकरन करणे महत्वाचे असताना विद्यापीठाच्या 30 मे रोजी झालेल्या बैठकीमध्ये मागणी केली होती. मात्र विद्यापीठ प्रशासनाने नुतनीकरन गरजेचे नसल्याचा अध्यादेश काढून टाकला आहे. एकाच पत्यावर 20 लोक राहत असलेल्या मतदार याद्या असून ते चुकीचे असल्याचे जमील देशपांडे यांनी म्हटले आहे. विद्यापीठ प्रशासनाकडे यासंदर्भात माहिती अधिकारात माहिती मागितली असता टाळाटाळ करण्यात येत असून यासंदर्भात लढाई लढणार असल्याचे त्यांनी सांगितले.
30 जून पर्यत मुदत द्यावी
2015 मध्ये नोंदणीकृत पदवीधरांच्या यादीत नोंदणीसाठी व मतदार यादीत समावेशसाठी अर्ज केलेली व वैध ठरविण्यात आलेल्या पदवीधरांना अर्ज करण्याची आवश्यकता नसल्याचा खुलासा विद्यापीठाने दिला आहे. तसेच उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाने नवीन पदवीधरांना ऑनलाईन नोंदणी करण्यासाठी 19 जून ते 5 जुलै पर्यत मुदत दिली होती. मात्र कायद्यानुसार एक महिना नवीन पदवीधरणा मुदत देण्यात येते. म्हणून विद्यापीठाने 30 जुलै पर्यत नवीन मतदार यादी नोंदणी करावी अशी मागणी जमील देशपांडे यांनी केली. पत्रकार परिषदेवेळी संदीप मांडोळे, अशफाक पिंजारी उपस्थित होते.