उमवीत पहिले राज्यस्तरीय सर्पमित्र संमेलनाचे उद्घाटन

0

जळगाव । वन्यजीव संरक्षण बहुउद्देशीय संस्था आणि उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या संयुक्त विद्यमाने उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात पहिले राज्यस्तरीय सर्पमित्र संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. 25,26 फेबु्रवारी दरम्यान आयोजित करण्यात आलेल्या दोन दिवसीय राज्यस्तरीय सर्पमित्र संमेलनाचे उद्घाटन शनिवारी 25 रोजी विद्यापीठाच्या सिनेट हॉलमध्ये करण्यात आले. सर्पमित्रांचा 2 ते 5 लाखाचा विमा काढण्याची घोषण आमदार सुरेश भोळे यांनी केली. प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.

‘सापाची अद्भुत दुनिया’ पुस्तक प्रकाशन
सर्पमित्रांची इच्छाशक्ती व जिद्द खुप मोठी असुन त्यांनी सर्पाविषयी समाजात असलेले समज गैर-समज दुर करण्यासाठी प्रयत्न करावे असे आवाहन त्यांनी केले. विद्यापीठ परिसरातील जौवविविधा सूची, सर्पमित्र रक्तदाता सूची, ‘सापाची अद्भुत दुनिया’ या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. या ठिकाणी ते प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. अध्यक्षस्थानी अनिलकुमार खौर होते. आमदार चंदु पटेल, कुलगुरु प्रा.पी.पी.पाटील, कुलसचिव प्रा.ए.बी.चौधरी, प्रा.एस.टी.इंगळे, नाना भूतकर, रविंद्र सोनवणे, केदार भिडे, डॉ.गिरी,अश्‍विनी खोडपे, नरविरसिंह रावल उपस्थित होते.