बारामती । यावर्षी प्रथमच आद्य क्रांतीवीर राजे उमाजी नाईक यांची जयंती बारामती तहसील कार्यालयात मोठ्या उत्सहात साजरी करण्यात आली. मुख्यमंत्र्यांनी उमाजी नाईक यांची जयंती साजरी करण्याचा आध्यादेश काढल्यामुळे समाज बांधवामध्ये आनंदाचे वातावरण दिसून आले.
तहसीलदार हनुमंत पाटील यांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी पाटील म्हणाले की, फक्त फोटोला हार घालून थांबून चालणार नाही तर वैचारिक क्रांतीसाठी राजे उमाजी नाईक यांचे चरित्र घराघरात पोहचले पाहिजे, असे त्यांनी यावेळी सांगितले. भाजपचे बापुराव सोलनकर, हिंदुस्थान प्रजा पक्षाचे राज्य उपाध्यक्ष संभाजीराजे चव्हाण ढाकाळकर, संपत टकले, रवींद्र टकले, राजेंद्र झगडे, चंद्रकांत खोमणे, मनोज पाटोळे, उमाजी जाधव, गणेश चव्हाण, रोहिदास जाधव, नितीन जाधव, अक्षय जेडगे, अजित लोखंडे, चिकु जाधव, सिमलेश चव्हाण अध्यक्ष, हेमंत चव्हाण, सचिन तांबे, सचिन चव्हाण, ओंकार आडके, राजेंद्र जाधव आदी मान्यवर याप्रसंगी उपस्थित होते.