उमेदवारांच्या उपस्थितीत मतदान यंत्राला लावले सील

0

भुसावळ– तालुक्यातील चार ग्रामपंचायतीसाठी 27 रोजी निवडणूक होत शुक्रवारी या केंद्रावरील मतदान यंत्र उमेदवार व त्यांच्या प्रतिनिधींच्या समक्ष सील करण्यात आली.

प्रभारी तहसीलदार संजय तायडे यांची उपस्थिती होती. मंगळवार, 27 रोजी तालुक्यातील वराडसीम, चोरवड, गोजोरा, सुनसगाव येथील ग्राम पंचायतींच्या पंचवार्षिक तर पिंप्रीसेकम येथील ग्रामपंचायतीची पोटनिवडणूक होत आहे. सरपंच निवड थेट मतदारांमधून केली जाणार आहे, त्यामुळे मतदानात चुरस निर्माण झाली आहे. तहसील कार्यालयात शुक्रवारी सकाळी 11 वाजता निवडणुकीतील उमेदवार व त्यांचे प्रतिनिधी यांच्या उपस्थितीत 17 मतदान यंत्राना सील लावण्यात आले. तालुक्यातील वराडसीम, चोरवड, गोजोर, सुनसगाव येथील पंचवार्षिक तर पिप्रीसेकम येथील पोट निवडणूक मंगळवारी तर बुधवारी मतमोजणी होणार आाहे, सोमवारी मतदान साहित्याचे वाटप केले जाणार आहे.