मतदानाचा टक्का वाढण्यासाठी विविध उपाययोजना सुरू
जळगाव । महानगर पालिकेच्या निवडणुकीच्या रिंगणात असलेल्या प्रत्येक उमेदवारांच्या बँक खात्यांवर आमची करडी नजर असेल, त्यासाठी निवडणुक आयोगाने स्वतंत्र पथक नियुक्त केले आहे. यात विक्री कर व आयकर विभागाची टीम यासाठी तयार असून ते सर्व बँक खाते व खर्चाची तपासाणी करणार आहेत .यात काही तफावत आढळल्यास उमेदवारांवर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती राज्य निवडणुक आयुक्त जे.एस सहारिया यांनी पत्रकार परिषदेत दिली.
महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या विविध उपाययोजनांसंदर्भात माहिती देण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात पत्रकार परिषदेेचे आयोजन करण्यात आले होेते. यावेळी याप्रसंगी यावेळी मुख्य निवडणुक निरिक्षक प्राजक्ता लवांगरे, जिल्हाधिकारी किशोरराजे निंबाळकर,मनपा आयुक्त तथा मुख्य निवडणुक अधिकारी चंद्रकांत डांगे, जिल्हा पोलिस अधिक्षक दत्तात्रय कराळे, उपआयुक्त चंद्रकांत खोसे उपस्थित होते. जळगाव निवडणुकीत 3 लाख 65 हजार 75 मतदार आहेत. यासाठी 19 प्रभाग असून त्यामध्ये 18 प्रभागातून 4 सदस्य तर एका प्रभागातून 3 सदस्य निवडले जाणार आहे. या मतदानासाठी 469 मतदान केंद्र असुन 146 संवेदशिल केंद्र आहे. रा संवेदनशील मतदान केंद्रांवर त्याठिकाणी कडेकोट पोलिस बंदोबस्त लावण्यात येणार आहे.त्याठिकाणी व्हिडीओ कॅमेरा सुध्दा बसविण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
या निवडणुकीसाठी 3 हजार अधिकारी व कर्मचारी तसेच पोलिसांचे 2500 अधिकारी व कर्मचारी याची नियुक्ती करण्यात आली आहे. मतदान प्रक्रीरा ही पारदर्शक व निर्भिडपणे पार पाडण्यासाठी चोख बंदोबस्त लावण्यात आला आहे. गुंड प्रवृत्तीच्या लोकावर प्रतिबंधक कार्यवाही करण्याचे काम सुरू झाले आहे. 5 चेक पोस्ट पथक, 3 भरारी पथक, 19 व्हिडीओ सर्व्हिलियन्स टिम, 3 व्हिडीओ विविंग टिम, 1 रेल्वे भरारी पथक, 4 आयकर अधिकारी पथक, अशा पथकाची नियुक्ती करण्यात आली असल्याची माहिती सहारिया यांनी दिली.निवडणूकीत मतदानटक्का वाढविण्यासाठी एफ.एम रेडिओ, एलईडी डेमो व्हॅन, तसेच मुस्लिम भागात कव्वालीचे आयोजन करून तर दुसरीकडे वासुदेवाच्या माध्यमातुन मतदान करण्राबाबत जनजागृती करण्यात येणार आहे. याचबरोबर 28 रोजी मतदान करण्याचे आव्हानासाठी प्रभात फेरीचे आयोजन करण्यात आले आहे.