उमेदवारी दाखल करण्यासाठी अर्जांचा पाऊस

0

जळगाव । जिल्ह्यात होणार्‍या जिल्हा परीषद व पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी इच्छुकांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी तहसिल कार्यालयात एकच गर्दी जमली होती. यावेळी पक्षाचे उमेदवारांसह अपक्षांचीही मोठ्या संख्येने उपस्थिती होती. दरम्यान आज उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस असल्याने इच्छुकांनी जोरदार शक्ती प्रदर्शन करत आपले उमेदवारी अर्ज दाखल केले. जिल्ह्यात भाजपा, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेसने सर्वज जागांवर आपले उमेदवार देण्याचा प्रयत्न केला आहे. तर काँग्रेस पक्षाने काही जागांवरच आपले उमेदवार उभे केले आहेत. या निवडणुकीत आजी माजी नेते, पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांची पक्ष पणाला लागली आहे.उमेदवारी अर्जांची छाननी आज गुरूवार 2 फेब्रुवारी रोजी होणार असून छाननी मध्ये किती अर्ज बाद होऊन किती शिल्लक राहतात त्यानंतर 7 फेब्रुवारी रोजी माघारी अंती उमेदवारांचे चित्र स्पष्ट होणार आहे.

धरणगाव । येतील पंचायात समिति गनातील 12 जिल्हा परिषद गटासाठी 12 असे एकूण 12 अर्ज शेवटच्या दिवशी उमेदवारानी दाखल केले यात राज्यमंत्री गुलाबराव पाटिल यांचे पुत्र प्रताप पाटिल यांनी देखील उमेदवारी पाळधी बांभोरी प्रचा या जिल्हा परिषद गटातून आपली उमेदवारी दाखल केली आहे. त्या मुळे संपूर्ण तालुक्याचे लक्ष याकडे लागले आहे. संपूर्ण धरणगाव तालुक्याचे जिल्हा परिषद गट व पंचायत समिती गण धरणगाव तहसील कार्यालयात भरण्यात आले उमेदवारांची गर्दी वाढू लागल्याने दमछाम सुरु होती त्याच बरोवर उमेदवारांच्या समर्तकांची गर्दी उसड़ू लागली होती बम्बोरी पाळधी राष्टवादी कडून रमेश पाटिल हे राज्यमंत्री गुलाबराव पाटिल यांचे खंदे समर्तक ओळखले जातात यांनी आपली उमेदवारी केली त्याच
प्रमाणे पिम्प्रि भाजपचे पी.सी. आबा पाटील यांच्या सैभाग्यवती वैशालीताई पाटील व शिवसेनेकडून डी. ओ. पाटिल व राष्ट्रवादी कडून अविनाश पावर व टी. डी. पाटिल यांना दोन ए बी फॉर्म जोडलेले आहेत. साळवा बम्बोरी भुसावळचे नगरसेवक चंद्रशेखर अत्तरदे यांच्या सैभाग्यवती माधुरी अत्तरदे व राष्ट्रवादी कडून उषाताई गोपाल पाटिल पिंपळे येतील माजी ग्रामपंचायत सदस्य आहेत. व शिवसेनेकडून माजी जिह्ला उपद्यक्ष जनकिराम पाटिल यांच्य सैभाग्यवती संगीताताई पाटिल हे आहेत यात जिह्ला परिषद गटासाठी असे एकूण 110 अर्ज आलेले आहेत यात सळवा बम्बोरी गटात 17, सोनवद पिम्परी मधे 11, पाळधी बांभोरी गटात 10 अर्ज आलेले आहेत. पंचायत समितीसाठी सळवा गणातून 10, बांभोरी बू 9, सोनवद खु 11, पिंप्री 7, पाळधी बू 8, बांभोरी प्रचा 7 असे एकूण 52 अर्ज पंचायत समितिसाठी या गणातून आलेले आहेत.

अमळनेरात उमेदवारांचे 87 अर्ज
अमळनेर । येथील जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी आज उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या दुसर्‍या दिवशी 87 उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत त्यात जि.प.साठी 19 उमेदवारांचे 25 तर पं.स.साठी 48 उमेदवारांचे 62 अर्ज दाखल केलेत. जिल्हा परिषदेसाठी कळम सरे जळोद गटातून पाटील जयश्री अनिल 3 अर्ज स्वाती विनायक पाटील 2 अर्ज पाटील सिंधुबाई प्रताप, पाटील प्रतिभा ज्ञानेश्वर पांतोंडा दहिवद गटातून पाटील ममता मिलिंद 2, पाटील मिनाबाई रमेश, रजुभाई भागवत पाटील, जाधव प्रतिभा हर्षल, मुडी प्र डांगरी मांडळ गटातून भिल संगीता भिका 2, चव्हाण ताराबाई रमेश, भिल जिजाबराव हरसिंग, पारधी शांताबाई भीमराव, भिल सुनंदाबाई संतोष, भिल हिराबाई दशरथ जानवे शिरुड गटातून सोनवणे ललिता जगदीश 2, भिल रत्नाबाई गंभीर, सोनवणे शोभाबाई जगनाथ,भिल सरला मानसिंग, पवार सोनू राजू ह्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले. तर पंचायत समिती साठी मुडी प्र डांगरी गणातून पाटील सुभाष यशवंत,पाटील दिलीप धनगर,पाटील भिकेश पावबा, पाटील रविंद्र पोपटराव,पाटील नरेंद्र बाळू,पाटील विजय काशिनाथ,पाटील संजय त्र्यम्बक, पाटील सुनील विश्वास, पाटील पराग श्याम, कोळी गोपीचंद सिताराम मांडळ गणातून भिल निर्मला भाईदास, भिल येनुबाई पांडुरंग, भिल वजाबाई नामदेव, शिरसाठ वंदना दीपक, भिल शांताबाई मोतीराम कळमसरे गणातून कोळी सुरेखा राजेंद्र, पाटील आशाबाई उमाकांत, पाटील अनिता संजय, पाटील विजया भिकन,कोळी हिरकन गंगाराम, पाटील कविता प्रफुल्ल शिरुड गणातून पाटील कविता अर्जुन, पाटील विद्या महेंद्र, पाटील आशाबाई गोविंदा, पाटील त्रिवेणीबाई शिवाजी, पाटील प्रतिभा संतोष,पाटील अनिता नितीन, पाटील मीराबाई निंबाजी दहिवद गणातून जाधव विनोद नामदेव, पाटील मिलिंद वामन, सोनवणे अतुल संभाजी, पाटील बंडू लक्ष्मण, गोसावी किरण भरतगिर, सुरेखा मधुकर पवार, सुतार भगवान चिंधा पातोंडा गणातून किरणकुमार पुंडलिक मोरे, सदांशिव चारुदत्त चापा, बागुल निवृत्ती पुंजू, मोरे विजय कृष्णा, मोरे सागर नथ्थू जळोद गणातून पवार नारायण दिपचंद, पवार किरण भालेराव, पाटील प्रवीण वसंत, पाटील अशोक जगनाथ,पाटील महेंद्र गुलाब जानवे गणातून पाटील विजया प्रकाश, पाटील रेखा नाटेश्वर, पाटील कल्पना राजेंद्र यांनी आज 1 रोजी उमेदवारी अर्ज निवडणूक निर्णय अधिकारी संजय गायकवाड व सहायक निवडणूक निर्णय अधिकारी प्रदीप पाटील यांच्या कडे दाखल केले.

जळगावला गटासाठी 45 तर गणासाठी 90 अर्ज : जळगाव तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या गण भोकर 7, कानळदा 14, ममुराबाद 11, असोदा 9, भादली ब्रु. 9, नशिराबाद 5, चिंचोली 7, शिरसोली प्र. बु. 17, म्हसावद 4, बोरनार 7, गट कानडदा-भोकर 7, आसोदा-ममुराबाद 10, नशिराबाद- भादली बु. 7, शिरसोली प्र. बु. -चिंचोली 15, म्हसावद-बोरनार 6 उमेदवारांनी आपले अर्ज भरले आहेत.

जामनेरातून जि.प. गट व पं.स. गणासाठी उमेदवारी अर्ज दाखल
जामनेर । तालुक्यातून जि.प. गटाच्या 7 जागांसाठी व पं.स. गणाच्या 14 जागांसाठी आज उमेदवारी दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले. भाजपातर्फे जि.प. गटासाठी सुनिता विलास पाटील – वाघारी बेटावद, रजनी जगन्नाथ चव्हाण – फत्तेपूर/तोंडापूर गट, विद्या दिलीप खोडपे – नेरी पळासखेडा गट, बेबी तुकाराम पाटील – शेंदुर्णी – नाचणखेडा गट, अमीत महेश देशमुख पहुर – वाकोद गट, कल्पना राजेश पाटील – शहापूर – देऊळगाव गट, विजया समाधान पाटील पाळधी – लोंढरी गट तर संभाजी ब्रिगेड पक्षांकडून वाकोद – पहुर पेठ जि. प. गटासाठी किरण प्रभाकर पाटील यांना उमेदवारी दिली आहे. तसेच भाजपाकडून पं.स. गणाचे उमेदवारी सुनंदा प्रल्हाद पाटील वाघारी गण, रमण तुकाराम चौधरी – बेटावद गण, एकनाथ पांडुरंग लोखंडे – फत्तेपूर गण, तडवी जलाल सुलेमान – तोंडापूर गण, संगीता आनंदा पिठोडे – पळासखेडे गण, अमर शिवाजी पाटील – नेरी गण, अमृत नामदेव खलसे – शेंदुर्णी गण, मनाबाई धनराज चव्हाण – नाचणखेडा गण, आशा शंकर जाधव – पहुरपेठ गण, सुरेश नामदेव बोरसे – वाकोद गण, रूपाली नवलसिंग पाटील – शहापूर गण, गोपाल धिरसिंग नाईक – देऊळगाव गण, निता कमलाकर पाटील – पाळधी गण, उज्ज्वला संजय साबळे – लोंढरी गण तर संभाजी ब्रिगेडतर्फे पं.स. गणासाठी उमेदवार पुढील प्रमाणे प्रभाकर पंढरी साळवे – फत्तेपूर गण, शितल कैलास जाधव – तोंडापूर गण, नितेश मोरन दारकोंडे – बेटावद गण, राजश्री देवेंद्र घोंगडे – पहुरपेठ गण, संतोष रतन कुमावत – नेरी गण, शोभाबाई सिताराम सोनवणे – वाघारी गण तर जि.प. गटासाठी राष्टवादीच्या कोठ्यातून शेंदुर्णी गटात सरोजनी संजय गरूड, तोंडापूर गटातून विजया डिंगबर पाटील, पाळधी गटातून पी.एस. पाटील, नेरी गटातून ज्योती नाना पाटील, पहुर गटातून भास्कर शंकर पाटील यांच्या पत्नी संगिताबाई यांच्या अधिकृत उमेदवार्‍या दाखल झाल्या आहेत. आघाडीकडून गणातील अधिकृत उमेदवारांची यादी प्रसिध्दी माध्यमांना संबधीतांनी उपलब्ध करून न दिल्यामुळे गणातील उमेदवारांबाबत कुठलाही दुजोरा आघाडीकडून मिळू शकला नाही. एकंदर नेरी आणि वाघारी गटातून हमीच्या उमेदवारांनी पाठ दाखविल्याने ऐनवेळी पक्ष नेतृत्वाखाला सामान्य कार्यकर्त्यांना उमेदवार्‍या बदल कराव्या लागल्यात.

बोदवड । जिल्हा परिषदेच्या शेलवड – साळसींगी(बोदवड) गटातून उमेदवारी दाखल करतांना सौ. अंकीता संदिप पाटील सोबत काँग्रेस पक्षाचे माजी जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. जी. एन. पाटील, अ‍ॅड. रविंद्रभैय्या पाटील, संदीप पाटील, जिल्हा राष्ट्रवादीचे समन्वयक विलास पवार आदी.

चोपडा तालुक्यात जि.प.साठी 69,
पं.स.ला 93 अर्ज
चोपडा । तालुक्यातील जिल्हापरिषद निवडणुकीतील सहा जागांसाठी 69 अर्ज दाखल करण्यात आलेले आहेत.तर पंचायत समितीच्या बारा जागांसाठी 93 उमेदवारांनी आपले नामनिर्देशन पत्र दाखल केले आहेत. जि.प.गट निहाय आलेले अर्ज पुढील प्रमाणे चौगाव विरवाडे (7),अडावद धानोरा (12),अकुलखेडा चुंचाळे (18),घोडगाव लासूर (12),चहार्डी बुधगाव (7),वर्डी गोरगावले (13).तसेच पंचायत समिती गणांसाठी आलेले अर्ज पुढील प्रमाणे चौगाव (7),विरवाडे (11),धानोरा प्र.अ.(5),अडावद(8),चुंचाळे (5),अकुलखेडा (4),लासूर (5),घोडगाव (12),चहार्डी (7),बुधगाव (7),गोरगावले बु.(13),वर्डी (9).
भडगावात तिन गटासाठी 10 अर्ज

भडगाव । तालुक्यातील जिल्हापरिषद निवडणुकीतील तीन जागांसाठी 10 अर्ज दाखल करण्यात आलेले आहेत. तर पंचायत समितीच्या सहा जागांसाठी 28 उमेदवारांनी आपले नामिर्देशन पत्र दाखल केले आहेत. यात जि. प. निहाय पक्षनिहाय आलेले अर्ज पुढील प्रमाणे वडजी (भाजपा 1, शिवेसना 2, राष्ट्रवादी 1, अपक्ष 1 एकूण 8), गुढे (भाजपा 1, शिवसेना 1, राष्ट्रवादी 1, अपक्ष 1 एकूण 4), गिरड (भाजपा 1, आपीआय 1, राष्ट्रवादी 1, अपक्ष 3 एकूण 6), कजगाव (भाजपा 1, शिवसेना 1, राष्ट्रवादी 1, अपक्ष 3 एकूण 6 ), वाडे (भाजपा 1, राष्ट्रवादी 1, अपक्ष 1), आमढदे (भाजपा 1, शिवसेना 1, राष्ट्रवादी 1, अपक्ष 1 एकूण 4) तसेच गुढे-वडजी गटात (भाजपा 1, राष्ट्रवादी 1, शिवसेना 2, अपक्ष 1 एकूण 5), कजगाव वाडे गट (भाजपा 1, शिवसेना 1, राष्ट्रवादी 1 एकूण 3).

एरंडोलला गटासाठी 14 तर
गणांसाठी 46 अर्ज दाखल
एरंडोल ।तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या तीन गटांसाठी 14 उमेदवारांनी 15 अर्ज दाखल केले तर पंचायत समितीच्या सहा गणांसाठी 46 उमेदवारांनी आज उमेदवारी अर्ज दाखल केले.उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा आज अखेरचा दिवस असल्याने राजकीय पक्षाचे उमेदवार त्यांचे समर्थक व पदाधिकार्‍यांनी तहसील कार्यालय परिसरात मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती.सर्वच उमेदवारांनी जोरदार शक्ती प्रदर्शन करून उमेदवारी अर्ज दाखल केले.

चाळीसगाव 7 जि प गटात 70 तर 14 गणात 120 उमेदवारी अर्ज दाखल
भाजप कडून अंतिम यादी निश्चित, शिवसेना वाघळी गण वगळता सर्व जागा लढणार, राष्ट्रवादी काँग्रेसचे काही ठिकाणी डबल उमेदवार तर काँग्रेसचे 2 गणात स्वतंत्र उमेदवार 7 जिल्हा परिषद गट व 14 गणांसाठी आज 1 फेबु्रवारी रोजी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी एकुण 190 उमेदवारी अर्ज दाखल झाले असून गटामध्ये 70 तर गणामध्ये 120 अर्ज दाखल झाले आहेत. भाजप कडून गट व गणामध्ये सर्वच्या सर्व एकुण 21 उमेदवारांनी अर्ज दाखल केले. राष्ट्रवादी काँग्रेसकडून गट व गणामध्ये काही ठिकाणी 2-2 उमेदवार दिले असून अर्ज छाननी व माघारी नंतर त्यांचे उमेदवार स्पष्ट होणार आहेत. शिवसेनेने वाघळी गण वगळता 20 उमेदवार दिले असून काँग्रेसने राष्ट्रवादी काँग्रेस सोबत युती असतांना 2 गणांमध्ये स्वतंत्र उमेदवार दिले आहेत.

भाजपकडून बहाळ – कळमडू गटासाठी यशवंत रंगराव सोनवणे, मेहुणबारे दहीवद – मोहीनी अनिल गायकवाड, वाघळी पातोंडा – पोपट तात्या भोळे, रांजणगाव पिंपरखेड – डॉ मोनिका सचिन राठोड, तळेगांव देवळी – किशोर भिकनराव पाटील, करगाव-टाकळी प्र.चा – मंगला भाऊसाहेब जाधव, उंबरखेड सायगाव – रोहन अमृतराव सुर्यवंशी तर कळमडू गणात प्रभाकर जाधव, बहाळ – स्मितल दिनेश बोरसे, दहीवद- कैलास पाटील, मेहुणबारे – रूपाली पियुष सांळूखे, वाघळी – मायाबाई पाटील, पातोंडा – संजय भास्कर पाटील, रांजणगाव – माधुरी सतिष पाटे, पिंपरखेड – नितीन सुकदेव पाटील, तळेगाव – सविता अनिल नागरे, देवळी – विलास पाटील, टाकळी प्र.चा.- वंदना दत्तु मोरे, करगाव – सुनिल साहेबराव पाटील, सायगाव – भारती मारोती काळे, उंबरखेड – मनिषा पदमाकर कोळी,
राष्ट्रवादी काँग्रेस कडून बहाळ – कळमडू गटासाठी शशिकांत भास्करावर साळूंखे, राजेंद्र काशिनाथ माळी, वाघळी पातोंडा – शेनफडू निंबा पाटील, ज्ञानेश्वर एकनाथ महाजन, देवळी तळेगांव – किशोर माधवराव पाटील, अतुल अनिल देशमुख, करगांव टाकळी प्र.चा.- भगवान राजाराम एरंडे, शंकर भावराव पाटील, उंबरखेड सायगाव – भुषण काशिनाथ पाटील, प्रशांत उदेसिंग पाटील, मेहुणबारे दहीवद -कलाबाई आनंदा कोळी, रांजणगाव पिंपरखेड – सुनंदा सिताराम चव्हाण, चंद्रभागा नवल राठोड, तर गणामध्ये बहाळ – सौ. रूपाली रवि पाटील, सौ. केशरबाई विक्रम महाजन, कळमडू – भाऊसाहेब चिंतामन केदार, छाया दिलीप महाले, वाघळी – प्रमिलाबाई अमृतराव सोनवणे, मिनाबाई ज्ञानेश्वर महाजन, पातोंडा – अनिल शामराव माळी, संदीप यशवंत पाटील, देवळी – अजय भाऊसाहेब पाटील, छगन तुळशीदास पाटील, तळेगाव -प्रिती विष्णू चकोर, सोनाली अतुल देशमुख, करगांव -वैशाली बापुराव पाटील, शंकर भाऊराव पाटील, टाकळी प्र.चा.- कविता सुर्यकांत ठाकूर, उंबरखेड – शिवाजी संपत सोनवणे, सायगाव – भारती सुनिल पाटील, मेहुणबारे -पुनम प्रदीप पवार, सौ. कविता राजेंद्र देशमुख, दहीवद – जयाजी सुकदेव भोसले, रांजणगांव- सौ. सुनंदा जिभाऊ पाटील, पिंपरखेड – लता बाजीराव दौंड व बाजीराव दत्तु दौंड यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत.

शिवसेनेकडून तळेगाव – देवळी गटासाठी प्रविण महारू पाटील, सायगाव उंबरखेड – तुषार दत्तु पाटील, रांजणगाव पिंपरखेड – गोदावरी भास्कर राठोड, मेहुणबारे दहीवद – रंजाबाई पंडीत मोरे, वाघळी पातोंडा – संजय शिवाजी पाटील, कळमडू बहाळ – रोहीदास लाला पाटील, करगाव टाकळी प्र.चा.- हनुमंत जाधव, तर गणासाठी बहाळ – डॉली वासुदेव पाटील, कळमडू – संजय धुडवूै देवरे, रांजणगाव – ललिता बळीराम चव्हाण, पिंपरखेड – हर्षद सुरेश पाटील, मेहुणबारे – वैशाली विलास भोई, दहीवट – टंकनेश्वर निकम, सायगाव – भारती प्रमोद पाटील, उंबरखेड – अनिल भरत भिल्ल (पुरस्कृत), पातोंडा – संजय संतोष पाटील, करगाव – समाधान भानुदास मराठे, टाकळी – सुरेखा सोमनाथ कोळी, तळेगाव – मिना पंडीत शेलार, रावसाहेब गोविंदा पाटील यांचे उमेदवारी अर्ज दाखल झाले असून ऑनलाईन प्रक्रिया व वेळेअभावी वाघळी गणात उमेदवारी अर्ज दाखल होऊ शकला नसल्याची माहीती तालुकाप्रमुख उन्मेष राजपूत यांनी दिली आहे.