उमेश,इंशातची जोडी प्रसिध्दीपासून दूरच राहिली

0

रांची । भारत व ऑस्ट्रेलिया यांच्यासुरू असलेल्या कसोटी सामन्यात उमेश यादव व इंशात शर्मा यांनी मोक्याच्या क्षणी बळी घेवून मोलाची कामगिरी केली आहे. त्यांनी दुसर्‍या कसोटी सामन्यात चांगला मारा केला. भारताने या कसोटीत 75 धावांनी विजय मिळवला आणि मालिकेत 1-1 ने बरोबरी साधली.अशी कामगिरी करूनही ते प्रसिध्दीपासून दूर राहिले असे वक्तव्य भारतीय संघाचे प्रशिक्षक अनिल कुंबळे यांनी पत्रकारांशी बोलतांना केले. वेगवान गोलंदाज उमेश यादव व ईशांत शर्मा उल्लेखनीय कामगिरी करीत असून, ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेत महत्त्वाचे बळी घेत भारताला वर्चस्व गाजविण्याची संधी प्रदान करीत आहेत, अशा शब्दांत टीम इंडियाचे प्रशिक्षक अनिल कुंबळे यांनी वेगवान गोलंदाजांची प्रशंसा केली. गुरुवारपासून रांचीमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध तिसर्‍या कसोटी सामन्याला प्रारंभ होत आहे.कुंबळे म्हणाले, उमेश ज्या वेळी गोलंदाजीला येतो त्या वेळी तो पाच बळी घेईल, असे वाटते.सर्व लक्ष मात्र फिरकीपटूंची जोडी आश्विन व जडेजा यांच्याकडे असते. त्यांनी पहिल्या दोन कसोटी सामन्यांत बरीच गोलंदाजी केली असून, बर्‍याच विकेट
घेतल्या आहेत.