उमेश यादवच्या परतण्याने केकेआरची ताकद वाढली

0

कोलकत्ता । भारतीय संघाचा जलद गोलंदाज उमेश यादव ने आपल्या ट्विट सांगितले की तो केकेआर संघासोबत खेळणार आहे. तो व्यायामशाळेत व्यायाम करित असतांना फोटो टाकला आहे.तो म्हणाला आहे की, अभ्यास सत्रात चांगली कामगिरीची आशा आहे.घरच्या कसोटी मालिकेत खेळतांना तो दुखापतग्रस्त झाला होता. ज्यामुळे तो आयपीएलचे सुरवातीचे सामने खेळू शकला नाही.

मात्र तो आता संघात परत येत आहे. त्यामुळे केकेआर संघाच्या गोलदांजी मजबुत होणार आहे.उमेशने बर्‍याच वेळेपासून चांगली गोलदांजी करित आहे.तो लयमध्ये आहे.कांगारू विरूध्दच्या कसोटी मालिके त्याने 4 कसोटीत 17 गडी बाद केले आहे. तो कोलकत्ता नाईट राइडर्सचा मुख्य गोलंदाजाची भूमिकेत दिसणार आहे.मागील सामना खराब गोलंदाजीमुळे मुंबई सोबत हारले होते. सध्याला केकेआरची गोलंदाजी जबाबदारी ट्रेंट बोल्ट, क्रिस वोक्स आणि अंकित राजपूत यांच्या खांद्यावर आहे. त्याच्या योग्य ताळमेल बसत नाही आहे.