उरणच्या समुद्री बंधार्‍यांना धक्के पे धक्के!

0

उरण । मागील काही वर्षे उरण पनवेल तालुक्यातील खाजगी खड्याना भगदाडे पडत असल्याने या परिसरातील खोपटे ते वशेणी मार्गे पनवेल तालुक्यातील केळवणे पर्यंतच्या हजारो शेतकरयांना आपल्या वडिलोपार्जित शेतीत अन्नधान्य पिकवताच आले नसल्याची माहिती हाती आली आहे .यामध्ये खोपटे परिसरातील ववली भेंडी, पारांगी खार, काशेखार यांच्यासह वशेणी परिसरातील आणि पनवेल तालुक्यातील केळवणे परिसरातील अंतरा बामदा खाडी येथील हजारो एकर जमीन नापीक झाली आहे या सर्व समुद्री खाडयाचे समुद्री बंधारे बाधन्यासाठी किमान दोन ते अडीच कोटी रुपायांच्या निधीची गरज आहे ,या ठिकाणचे सर्व खाजगी आणि खारल्यंड विभागाच्या अखत्यारीतील समुद्री बंधारे धूप प्रतिबंधक बंधारे, राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन या नॉन प्लनिंग पद्धतीने झटपट निधी मिळणार्‍या योजनांतून कायमस्वरूपी दुरुस्त करण्याची गरज आहे.

खारेपाटात भात हे एकच पीक
उरण – पनवेल तालुक्याच्या खारेपाटात भात हे एकच पीक या जमिनीत घेता येते. येथील शेतकरी हिवाळ्यात व उन्हाळ्यात पाण्याच्या अभावी दुसरे पीक घेऊ शकत नाहीत.त्यातच उरण तालुक्याचा विचार करता या ठिकाणी करंजा सारख्या खाडीत काही खासगी कंपन्यांनी आपली खाजगी बंदरे भर समुद्रात शेकडो एकर भराव करून साकारली आहेत त्यामुळे समुद्रातील पाण्याचा प्रवाहच बदलून समोरच्या भागात असलेल्या खोपटा गावाकडील खाजगी मिठागरे आणि शेतीची तळी झाल्याचे चित्र आहे . पूर्वीच्या काळी शेतकरी अशा समुद्री बांधाना पडणारी भगदाडे जोळी घेऊन बजावत असत मात्र गेल्या काही वर्षांपासून मिठागरे पिकविण्याला शासनाने घातलेल्या बंदीच्या पार्श्‍वभूमीवर या सगळ्या जमिनी काहीशा बेदाद झाल्या आहेत. त्यातच भांड्वलदारांचा डोळा असलेली या भागातील शेती नापीक करून ती स्वस्त दरात ती भांड्वलदारांच्या घशात कशी घालता येईल, याचे नियोजनच तर शासकीय उच्चपदस्थ अधिकारी करीत नाहीत ना, अशी शंका यायलासुद्धा या निमित्ताने वाव आहे. समुद्राच्या उधाणामुळे भातशेतीची होणारे नुकसान हे नैसर्गिक आपत्तीमध्ये समाविष्ट करणे अपेक्षित आहे तशी अपेक्षाच माजी जिल्हा परिषद सदस्य डॉ. मनीष पाटील यांनी व्यक्त केली आहे .

शेतकर्‍यांना अनेक व्यवसाय उभारता येतील
या संपूर्ण खाडी किनारी पक्क्या स्वरूपाचा रस्ता झाल्यास त्याचे दोन फायदे होतील एक म्हणजे समुद्राच्या रुद्रावतारापासून खाड्याचे संरक्षण होईल आणि दुसरे म्हणजे अगदी खाडी किनारी असलेल्या जमिनीवर या भागातील शेतकरी बांधवांना छोटे मोठे व्यवसाय उभारता येतील. मात्र प्रशासनात बसलेल्या अधिकारी वर्गाला या प्रकाराची व्याप्तीच कळत नसल्याने या भागातील बंधारे पक्क्या स्वरूपाचे करण्याबाबत प्रशासकीय अधिकारी मात्र लक्षच देत नाहीत. केरळ सारख्या ठिकाणी जो ऍनाकोंडा नावाचा पॉइंट आहे त्या प्रकारचे अनेक पॉइंट उरण तालुक्याच्या समुद्री खाड्यामध्ये आहेत. मात्र, अशा ठिकाणी जाण्यासाठी पक्क्या स्वरूपाचे रसते करण्याचे प्रशासस्नाच्या कधी डोक्यातच बसले नाही. त्यामुळे मुंबईपासून हाकेच्या अंतरावरील असलेल्या या तालुक्यात पर्यटन क्षेत्र ही वाढू शकलेले नाही ही वस्तुस्थिती नाकारता येणार नाही.