उरणमध्ये अग्नितांडव; पाच जणांचा मृत्यू

0

रायगड– रायगड जिल्ह्यातील उरण ओएनजीसी गॅस प्लँटमध्ये भीषण आग लागली.या अग्नितांडवात पाच कामगारांचा मृत्यू झाला . तर तीन जण जखमी झाले आहेत.आग आटोक्यात आणण्यात अग्निशमन दलाला तीन तास लागलेे.मृतांमध्ये अग्निशमन दलाच्या तीन जवानांचा आहे. ही आग सकाळी 7 सुमारास आग लागली होती.
उरण शहरालगत असलेल्या ओएनजीसी गॅस प्लँटमध्ये वायू गळतीमुळे आग लागली. आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले. पनवेल, नेरूळ येथील अग्निशमन दलालाही पाचारण करण्यात आले होते. तब्बल तीन तासांच्या प्रयत्नानंतर आग आटोक्यात आणण्यात अग्निशमन दलांच्या जवानांना यश आले आहे. दरम्यान, अचानक लागलेल्या आगीमुळे गोंधळ होता. आगीत होरपळल्याने पाच जणांचा मृत्यू झाला आहे. धूरामुळे परिसरातील गावांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते.