सिडनी : वृत्तसंस्था- बॉल कुरतडण्याच्या प्रकरणानंतर अस्वस्थ डेव्हिड वॉर्नरने पत्रकार परिषद घेत, ऑस्ट्रेलियाकडून क्रिकेट खेळण्याची उरलीसुरली आशाही मावळली अशी निराशा व्यक्त केली व उपकर्णधार पदाचा राजीनामा दिला. बॉल टॅम्परिंग प्रकरणामुळे ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघाची चांगलीच बदनामी झाली. मात्र मला हा विश्वास आहे की टीम ऑस्ट्रेलिया पुन्हा एकदा नव्या जोषात आणि नव्या उत्साहात परत येईल. मी त्या संघाचा भाग आता नसेन असेच मला वाटते आहे कारण एवढे सगळे प्रकरण झाल्यावर मला वाटत होते की कदाचित मला मी जी चूक केली आहे त्यासाठी मला माफ केले जाईल. मात्र आता माफी मिळण्याची उरलीसुरली आशाही मावळली आहे. त्यामुळे मला वाटत नाही की यापुढे मी टीम ऑस्ट्रेलियाचा भाग असेन असे म्हणत त्याने देशाची माफी मागितली आहे.