‘उरीः द सर्जिकल स्ट्राइक’मधील यामीचा फर्स्ट लूक लाँच

0

मुंबई : शाहिद कपूरच्या ‘बत्ती गुल मीटर चालू’मध्ये वकीलची भूमिका साकारल्यानंतर बॉलीवुड अभिनेत्री यामी गौतम लवकरच ‘उरी:द सर्जिकल स्ट्राइक’ चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात यामी एक बुद्धिमान अधिकाऱ्याची भूमिका साकारणार आहे. या चित्रपटातील तिचे फर्स्ट लूक प्रदर्शित झाले आहे.

यामी गौतम आपल्या आगामी चित्रपट ‘उरी: द सर्जिकल स्ट्राइक’ साठी शूटिंग करत आहे. या चित्रपटात ती खुफिया अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसणार आहे. हा चित्रपट 2016 मध्ये भारतीय सैन्यानी केलेल्या ऑपरेशनवर आधारित आहे, हे ऑपरेशनवर काश्मीरमध्ये राबविण्यात आले  होते. यामी सोबत या चित्रपटात विकी कौशलही आहे.