‘उरी’ चित्रपटातील राजनाथ सिंह यांचे निधन !

0

नवी दिल्ली:भारतीय सैन्यदलाच्या शौर्यावर आधारित ‘उरी- द सर्जिकल स्ट्राईक’ या सुपरडुपर हिट चित्रपटात केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांची भूमिका करणारा अभिनेता नवतेज हुंडल यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात मागे पत्नी व दोन मुली आहेत.

हुंडल ‘‘उरी- द सर्जिकल स्ट्राईक’ या चित्रपटात अखेरचे दिसले होते. या चित्रपटात त्यांनी गृहमंत्र्यांची भूमिका साकारली होती. त्यापूर्वी त्यांनी संजय दत्तच्या ‘खलनायक’, ‘तेरे मेरे सपने’, ‘द विस्परर्स’ यासारख्या चित्रपटांत काम केले होते. अभिनयासोबत ते अभिनयाचे प्रशिक्षण देत. नवतेज यांची मुलगी अवंतिका हुंडल ही सुद्धा एक अभिनेत्री आहे. दिव्यंका त्रिपाठी व करण पटेल स्टारर ‘ये है मोहब्बतें’ या मालिकेत ती मिहिकाची भूमिका साकारते आहे.