पिंपरी । सहाय्यक यंत्र चालकपदासाठी महावितरण प्रशासनाने दिलेली जाहिरात रद्द करून, महावितरमध्ये काम करणार्या कंत्राटी कर्मचार्यांना या पदांवर कायम करावे, अशी मागणी महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघाने केली आहे. अर्थमंत्री सुधीर मुनगुंटीवार व ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची नुकतीच मुंबई येथे भेट घेत, या मागणीचे निवेदन सादर करण्यात आले. महावितरण कंपनीतील कंत्राटी कामगारांना भेडसावणारी वेतन समस्या, भविष्य निर्वाह निधी या प्रलंबित समस्यांकरिता 22 मार्चला झालेले आंदोलन व सातत्याने वीज कंत्राटी कामगारांच्या असलेल्या तक्रारींबाबतचे निवेदन सुधीर मुनगंटीवार यांना संघटनेच्या वतीने देण्यात आले.