उर्दू शाळेच्या प्रांगणात ग्रामस्थांचे अतिक्रमण

0

जळगाव। तालुक्यातील जारगाव येथील जिल्हा परीषद उर्दू शाळेसाठी जारगाव ग्रामपंचायतीने 1333 स्वेकर मिटर जागेसाठी 24 नोव्हेंबर 2014 रोजीच्या ठरावात मंजूर करून शाळेचे बांधकाम व इतर सुविधांसाठी दिलेला आहे. सद्यस्थितील या ठिकाणी शाळेचे दोन वर्ग व स्वच्छतागृहाचे बांधकाम करण्यात आले आहे.

सांडपाण्यामुळे विद्यार्थ्यांचे आरोग्य धोक्यात
लवकर हे दोन्ही वर्ग मुलांच्या शैक्षणिक वर्गासाठी खुले करण्यात येणार आहे. परंतू शाळेच्या आवारात काही लोकांनी कच्चे व पक्के अतिक्रमण केलेले आहे. शिक्षण हक्क कायद्यानुसार शालेलय विद्यार्थ्यांना खेळण्यासाठ क्रिडांगण गरजेचे आहे. तसेच सांडपाण्याचा निचरा होण्यासाठी मात्र याठिकाणी कोणतीही जागा नाही. त्यामुळे भविष्यात विद्यार्थ्यांच्या आरोग्याला धेाका निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तरी ग्रा.पं.ने त्वरीत कार्यवाही करावी अशी मागणी शाळा व्यवस्थापन यांनी जारगाव ग्रामपंचायत, जिल्हाधिकारी व जिल्हा परीषद यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.