उर्दू शाळेत अपूर्ण शिक्षकांमुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान

0

धुळे । धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यात असलेल्या पिंपळनेर येथील जिल्हा परिषदेच्या उर्दू शाळेत अपुरे शिक्षक असून शिक्षकांच्या कमतरतेमुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. पिंपळनेर येथील उर्दू शाळकत पहिली ते सातवी पर्यंत वर्ग आहेत. यात 111 अल्प भाषीक विघार्थी शिक्षण घेत आहे. इतक्या विद्यार्थ्यांमागे केवळ एकच शिक्षक आहे. एकटा शिक्षकांवर भार पडत असल्याने विघार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे याला जवाबदार कोण असा सवाल काँग्रेस अल्पसंख्याक विभागाचे चे साकी तालुका अध्यक्ष अलताफ अली सैयद यांनी पत्रकाद्वारे केली आहे. वेळोवेळी निवेदन देवुन ही शिक्षक मिळाले नाही. शाळेतील रिक पदे त्वरीत भरण्यात यावे अशी मागणी केली आहे.

पाच पैकी तीन शिक्षक; त्यातील दोन गैरहजर
याशाळेत शिक्षकांचे एकुण 5 पदे मंजुर असून सध्या शाळेत तिन शिक्षक कार्यरत आहे. त्यापैकी दोन पदे अघावत रिक्त आहेत. तीन पैकी एका शिक्षकाची जिल्हा परिषद उर्दू शाळा म्हसदी येथे प्रतिनियुकती करण्यात आली आहे. व एकाची जिल्हा परिषद शिक्षण विभागातील अधिकार्‍यांच्या मेहरबाणीने नेहमी प्रशिक्षणासाठी बाहेर गावी असल्याचा आरोप त्यांनी केले आहे. एका शिक्षकांची बदली शिदखेडा उर्दू शाळेत झाली आहे, पंरतु या शिक्षकाला गेल्या एक वर्षापासून कार्यमुक्त करण्यात आलेले नाही एकच शिक्षकांवर अध्यापनाची जवाबदारी आली आहे. त्यामुळे विद्यार्थी शिक्षणापासून वंचीत आहे.1 ते 7 वर्गाला शिकवताना कसरत करावी लागते तसेच शालेय पोषण आहार शिजवुन देणे, शैक्षणिक काम असे विविध कामे त्यांच्यावर आहे. रिक्त पदे त्वरीत भरण्यात यावे अन्यथा तिव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशाराही त्यांनी दिला आहे. साक्री तालुका काँग्रेस अल्पसंखाक विभागाचे अध्यक्ष अलताफ अली सैयद, जाकीर शेख, तौफीक शेख, जहुर जहॉगीदार, लियाकतसैयद, मोसिनशेख, सुदाम कुरेशी व शाळेतील मुलांच्या पालकांनी केली आहे.