उर्दू शिक्षक भरतीमध्ये फहीम शेख हेच दावेदार

0

चाळीसगाव : चाळीसगाव येथील अँग्लो उर्दू हायस्कुल घाट रोड येथील शिक्षक भरती प्रकरण 30 जून 2017 रोजी उपशिक्षक नासिर अहमद शेख अलिमोद्दीन (बीएड) हे सेवानिवृत्त होत असल्याने अनुदानित तुकडीवरील उपशिक्षक (बीएड) पदाचे 1 जागा रिक्त होत आहे. या जागेसाठी मोहम्मद फहीम शेख अब्दुल हकीम उपशिक्षक हे स्वतःच फक्त दावेदार असल्याचे त्यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे. सदर शिक्षक हे 15 जून 2008 पासून या शाळेत विना अनुदानित तुकडीवर कार्यरत आहेत. तसेच या रिक्त होणार्‍या जागेवर अन्य कुठलीही भरती करू नये अशा आशयाचे हरकत पत्र त्यांनी 14 मार्च 2017 रोजी व 8 जून 2017 रोजी शिक्षणाधिकारी माध्यमिक जिल्हा परिषद जळगाव व चाळीसगाव ए.ए.शाह एजुकेशन सोसायटी अध्यक्ष व सचिव सह संबंधित अधिकार्‍यांना पत्र व्यवहार केला आहे.

या पत्रावर विचार व अंमलबजावणी करत त्यांनी संस्थेस अनुदानित शाळेतून सेवानिवृत्त होणार्‍या रिक्त पदावर मोहम्मद फहीम शेख याना शैक्षणिक पात्रतेनुसार त्यांना अनुदानित शाळेत बदली होणेबाबत नियमानुसार आवश्यक ती कारवाई करावी असे विषयाचे पत्र शिक्षणाधिकारी यांना दिले आहे.

या आधीही याच शैक्षणिक सोसायटीत विना अनुदानित तत्त्वावरील उपशिक्षक मुदस्सीर खान हमीद खान याना पदोन्नतीने बीएड च्या जागेवर दि 1 ऑगस्ट 2012 रोजी नियुक्ती दिलेली होती त्या प्रमाणे मला हि पदोन्नती मिळावी हि माझी कायदेशीर व सनदशीर मागणी आहे. तसेच माझा नियुक्तिबाबाबत या आधीच माननीय पिठासीन अधिकारी शाळा न्यायाधिकरण नासिक यांचेकडे अपील न्यायप्रविष्ठ आहे. अशी सूचना मी शैक्षणिक विभागाला व इतर शिक्षकांना वेळोवेळी माहितीसाठी दिली आहे. आता तरी मला न्याय मिळावा.
– फहीम शेख हकीम (शिक्षक)