उर्मिला महंतची मोफत अँक्टिंग कार्यशाळा

0

मुंबई : मुंबईसारख्या झगमगत्या चित्रनगरीत नशीब आजमावयाला येणारे मोजताही येणार नाहीत. त्यातच चित्रपटसृष्टीत काम करण्यासाठी धडपडणारे ढिगभर असतात. मात्र सगळ्यांनाच चित्रपटसृष्टीत काम करण्याची संधी मिळतेच असे नाही. आणि हाच महत्त्वाचा धागा पकडून उर्मिला महंत यांनी नशिब आजमावण्यासाठी धडपड करणार्‍या विद्यार्थ्यांना मोफत अ‍ॅक्टिंगचे धडे देण्याचे ठरवले. अथर्व इन्स्टिट्यूट ऑफ फिल्म अँड टेलिव्हिजनतर्फे आयजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात उर्मिला महंत हिने मोफत अँक्टिंचे धडे विद्यार्यांना दिले.

अथर्व इन्स्टिट्यूट ऑफ फिल्म अ‍ॅण्ड टेलिव्हिजनने नुकताच आयोजित केलेला विनामूल्य ’अ‍ॅक्टिंग वर्कशॉप’ उत्साहात पार पडला. कार्यशाळेचे आयोजन बॉलिवुड अभिनेत्री उर्मिला महंत यांनी केले होते. उर्मिला महंत ही एक प्रतिष्ठित एफटीआयआयचे माजी विद्यार्थी आणि बॉलिवुड आणि क्षेत्रीय चित्रपट क्षेत्रातील कलाकारांना त्यांच्या कामासाठी ओळखले जाते. दिवसभर कार्यक्रम दरम्यान त्यांनी अनेक अभिनय व्यायाम माध्यमातून सहभागी ठेवले आणि सक्रियपणे कार्यवाही सहभाग होता. चित्रपटसृष्टित तिला आलेल्या अनुभवाबाबत तिने विद्यार्थ्यांना माहिती तर दिलीच पण त्याचबरोबर, उपस्थित असलेल्या इच्छुक कलाकारांना अनेक महत्त्वपूर्ण सूचना दिल्या. या सत्रात अनेक स्पर्धकांनी सहभाग घेतला होता.