मुंबई: लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचा जोर वाढला आहे. राजकीय नेतेमंडळी एकेक गाव पिंजून काढत आहे. जवळपास सर्वच उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. दरम्यान मुंबईत आज अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांच्यासह माजी खासदार प्रिया दत्त यांनी उमेदवारी अर्ज दखल केला. जोरदार शक्तिप्रदर्श करत अर्ज दाखल केला.
![](https://janshakti.online/new/wp-content/uploads/2019/04/priya-datt.jpg)
उत्तर मुंबईतून उर्मिला मातोंडकर तर उत्तर मध्य मुंबई मतदारसंघातून प्रिया दत्त कॉंग्रेसकडून निवडणुकीच्या रिंगणात आहे. उर्मिला मातोंडकर यांनी रोड शो करत उमेदवारी अर्ज दाखल केला. प्रिया दत्त यांच्यासोबत अर्ज दाखल करतांना अभिनेता संजय दत्त उपस्थित होते.