उर्मिला मातोंडकर बनली सोनाली कुलकर्णीची स्टायस्लिस्ट

0

मुंबई : ‘माधुरी’ या चित्रपटात सोनालीसह शरद केळकर आणि संहिता जोशी यांचीही प्रमुख भूमिका आहे. नुकताच या चित्रपटाच्या पहिल्या-वहिल्या गाण्याचा टीझर सोशल मीडियावर प्रदर्शित करण्यात आला आहे.

‘के सेरा’ हे या गाण्याचे बोल असून या गाण्यामध्ये सोनाली कुलकर्णीचा रॉकिंग लूक पाहायला मिळत आहे. ‘के सेरा’ हे गाणं प्रत्येकासाठी खास असेल. अर्थात, हे गाणं प्रत्येकासाठी खास बनवण्यामागे संगीत दिग्दर्शक, गायक-गायिका, गीतकार यांची मेहनत आहे. मराठी मनोरंजन क्षेत्रातील प्रेक्षकांचे आवडते गायक स्वप्निल बांदोडकर, जान्हवी अरोरा आणि मुग्धा कऱ्हाडे या गाण्यासाठी एकत्र आले आणि त्यांच्या सुमधूर, कमाल आवाजाने या गाण्याला रॉकिंग बनवले. वैभव जोशी यांनी या गाण्याचे बोल लिहिले असून अवधूत गुप्ते यांनी या गाण्याला संगीत दिले आहे. ‘के सेरा’च्या गाण्यासाठी खास उर्मिला मातोंडकरने सोनाली कुलकर्णीची स्टायलिंग केली आहे.

तसेच या गाण्याविषयी उर्मिला मातोंडकरने सांगितले की, “जेव्हा मी हे गाणं ऐकलं तेव्हा मला वाटलं की खरं तर हे गाणं प्रत्येक पिढीसाठी जणू आयुष्याचं अँथम आहे. वैभवने लिहिलेले शब्द ही सुंदर कविता आहे. अगदी साध्या-सोप्या भाषेत संपूर्ण आयुष्याचे सार आणि आयुष्य कसे जगावे हे सांगितले आहे”.