उलेमा काउंसिल व ईदगाह समीतीची सय्युक्त सभा सम्पन्न

0

मानधन उशिरा दया परंतु वाढ़वून दया – उलेमांची मागणी
जळगाव : मुस्लिम ईदगाह ट्रस्ट मार्फत जळगाव शहरातील मस्जिदीचे इमाम व मौजन यांना २०१० पासून दरमहा मानधन दिले जाते सदर चे मानधन वाढवून मिळावे म्हणून उलेमा कौंसिल चे अध्यक्ष मौलाना मुज़म्मिल,सचिव ज़ाकिर खान सह जळगाव शहर प्रमुख मुफ़्ती अतीकुर्रहमान,मौलाना नासिरूद्दीन कासमी, मौलाना हाफिज शफी पिरजादे, मौलाना ज़ाकिरदेशमुख,मौलाना नजमोद्दीन, यांनी ईदगाह कार्यालयात येऊन मानद सचिव फ़ारूक़ शेख,खजिनदार अशफाक बागवान,सह सचिव अनीस शाह ,विश्वस्त ताहेर शेख व आमंत्रित सदस्य अब्दुल वहाब मालिक यांची भेट घेऊन चर्चा केलि त्यात विविध मुदयावर समाधान कारक चर्चा होऊन मानधन उशिरा दिले तरी चालेल पण त्यात वाढ करुन ग्रामीण भागातील उलेमा चा समावेश करवा अशी मुख्य मागणी होती. मानद सचिव फ़ारूक़ शेख यांनी सदर मागणीचे निवेदन सभेत ठेऊन निर्णय घेण्याचे आश्वासन दिले.

उलेमांनी ट्रस्ट मधे शामिल होऊन सहकार्य-मार्गदर्शन करावे
ट्रस्ट तर्फे ईदगाहच्या कार्य साठी  विविध समित्यांचे गठन होत असून उलेमा कौंसिल ने सुद्धा आपले प्रतिनिधि सल्लागार समिति,कायम आमंत्रित सदस्य व कार्यकरी समिति मधे पाठवुन ईदगाह ट्रस्ट ला मार्गदर्शन करावे असे आवाहन सुद्धा फ़ारूक़ शेख यांनी उलेमा कौंसिल ला केलेले आहे. मुफ़्ती अतीकुर्रहमान यांनी पवित्र कुरआन पठन व दुआँ करुन कार्यक्रमाची सांगता केली. आभार अनीस शाह यांनी मानले.