उल्लेखनिय काम करणार्‍यांना प्रोत्साहित करावे

0

फैजपूर । आई, वडिलांसारखे साक्षात दुसरे दैवत नाही म्हणून त्यांचा आदर करुन सेवा करा, विनम्र बना, मोह टाळा, प्रा. होले यांनी आध्यात्मिक कार्यक्रमाला सामाजिकतेची जोड देवून समाजातील उल्लेखनिय काम करणार्‍यांचा सत्कार करुन पुढे जाण्यासाठी प्रोत्साहित केले. हे कार्य प्रेरणादायी असेच आहे, असे विचार हभप दगडू महाराज यांनी मांडले. ते सावदा येथील लेखक प्रा. व.पु. होले यांच्याकडे पार पडलेल्या कीर्तन व सत्कार कार्यक्रमात ते बोलत होते.

यांचा करण्यात आला सत्कार
डॉ. उल्हास पाटील स्कुलची विद्यार्थीनी सृष्टी कोल्हे हिने राज्यस्तर व राष्ट्रीय धनुर्विद्या स्पर्धेत 11 पदक मिळविले तर आदित्य पाटीलने राज्यस्तरीय व राष्ट्रीय स्तरावरील कराटे स्पर्धेत दोन रजत पदक मिळविले. लेखा चौधरी या पहिलीतील विद्यार्थीनीने रोेबोजिनीअस स्पर्धेत पहिला क्रमांंक मिळवून सुवर्ण पदक मिळविले तर सुनिल पाटील यांची किसान दूध संस्थेत संचालक म्हणून निवड झाली. या सर्वांचा प्रा. होले यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

यांची होती उपस्थिती
यावेळी हभप संजय महाराज, नरेेंद्र नारखेडे, नगरसेविका मिनाक्षी कोल्हे, डॉ. धनंजय देशमुख, डॉ. मिनल देशमुख, डॉ. सोपान खडसे, डॉ. शंतनु सरोदे, डॉ. जितेंद्र पाटील, डॉ. चंद्रशेखर पाटील, राजेंद्र पाटील, संजय महाजन, उमाकांत पाटील, प्रा. सी.सी. सपकाळे आदी उपस्थित होते.