पं. नंदकिशोर कल्चरल सोसायटीच्यावतीने या
पिंपरी : पं. नंदकिशोर कल्चरल सोसायटी व नेहरू युवा केंद्र क्रीडा मंत्रायल, दिल्ली यांच्या संयुक्त विद्यमाने नंदकिशोर सभागृहात विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य करणार्या महिलांचा पुरस्कार देवून सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाची सुरूवात डॉ. पं. नंदकिशोर कपोते यांच्या शिष्यांनी नृत्यातील विविध प्रकार सादर करून झाली. यावेळी पिंपरी-चिंचवड महापालिकेचे सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार, नेहरू युवा केंद्राचे संचालक यशवंत मानखेडकर, पं. कपोते, नगरसेविका सुमन पवळे, कमल घोलप, अनुराधा गोरखे व पोलिस मित्र संघटनेचे अध्यक्ष राजेंद्र कपोते आदी उपस्थित होते.
यावेळी कथ्थक नृत्य गुरू पं. शमा भाटे, साहित्यासाठी मीना शेटे-संभू, वैद्यकीय क्षेत्रासाठी विवियन एस. डिकोस्टा, मनिषा गटकळ, शुभदा राऊत, गंगा धेंडे, मंगला रणपिसे, सामाजिक क्षेत्रासाठी उषा चव्हाण, कथकली नृत्यासाठी चिप्पी पद्मकुमार, उद्योगक्षेत्रासाठी स्वाती शिंदे, शैलजा कुलकर्णी यांना कीर्तन क्षेत्रासाठी, कुटुंब कल्याणसाठी अनुपमा शिंपी, प्रकाशनसाठी मिरा बढे या महिलांना पुरस्कार प्रदान करण्यात आले. पं. भाटे व मीना शेटे-संभूस यांनी मनोगत व्यक्त केले. हे पुरस्कार सोहळ्याचे नववे वर्ष असून आतापर्यंत 250 पेक्षा जास्त महिलांना पुरस्कार देण्यात आले आहेत. पक्षनेते पवार व उपस्थितांनी डॉ. पं. नंदकिशोर कपोते यांच्या कामाचे कौतुक केले. संदीप साकोरे यांनी सूत्रसंचालन केले.