उल्हासनगरमध्ये मुस्लिमांना कब्रस्तानासाठी मिळाले भुखंड

0

उल्हासनगर । उल्हासनगर शहर हे फक्त साडे तेरा किलोमीटर क्षेत्रफळात वसलेले असून शहरामधील मुस्लिम समाजाला मृतदेह दफन करण्यासाठी कल्याण, अबरनाथ अशा इतरत्र ठिकाणी जावे लागत होते. शहरातच कब्रस्तान उपलब्ध व्हावे म्हणुन मुस्लिम समाजाने अनेकदा आंदोलन, उपोषणाचा मार्ग अवलंबला होता. त्यांच्या या आंदोलनाची दखल महापालिका आणि राज्य शासनालाही घ्यावी लागली होती. यासंदर्भात मुस्लिम समाजाने 16 मे 2016 रोजी मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिकाही दाखल केली होती. प्रलंबित असलेल्या या याचिकेवर नुकतीच उच्च न्यायालयात सुनावणी झाली. त्यावेळी या याचिकेवर निर्णय देताना, मुस्लीम समाजाला विकास आराखड्यात मंजूर करण्यात आलेले चार भूखंड त्यांच्या ताब्यात द्यावे. असे आदेश दिले.

न्यायालयात मुस्लिम समाजाची बाजु मांडणारे वकिल अफरोज सिद्दीकी यांनी सर्वे नं58 म्हारळगावातील कल्याण, मुरबाड रस्त्या लागत असलेला भूखंडाचा आग्रह धरला होता. पण न्यायालयाने त्यांची ही मागणी फेटाळत सिद्दीकी यांनाच फटकारले. हा भुखंड कब्रस्तानासाठी दिला जाऊ नये म्हणुन त्यावर तेथील स्थानिक नागरिकानी स्थगिती आणली होती. त्यात हा भूखंड कब्रस्तानासाठी दिल्यास भविष्यात त्याठिकाणी जातीय तणाव निर्माण होऊ दोन समाजात संघर्ष निर्माण होऊ शकतो असा अहवाल प्रशासन व शासनाला पाठवला होता. उच्च न्यायालयाने कब्रस्थानसाठी उल्हासनगर नं 5 कैलास कॉलनी सर्वे नं .244 मधील 5550 मीटर व लगत असलेला सर्वे 245मधील 6811 मीटर असा एकूण 12361मीटर जागा हे दोन भूखंड, इ पी -18उल्हासनगर नं.2मधीलओटी सेक्शन हिंदू स्मशानभूमी जवळ 6274 मीटर,उल्हासनगर नं1इ पी-1 मधील आय डी या कंपनी जवळ 5000मीटर हे भूखंड देण्याचे आदेश दिले आहेत. मुस्लिम कब्रस्थानासाठी आमदार डॉ .बालाजी किणीकर, आमदार ज्योती कलानी यांनी विधानसभेत मुद्दा उचलून धरला होता.