उल्हासनगरमध्ये स्लॅब कोसळून तिघांचा मृत्यू

0

मुंबई : उल्हासनगरमधील एका जुन्या इमारतीचा स्लॅब कोसळून तीन जणांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. कॅम्प ३ भागातील मेमसाब नामक इमारतीत ही घटना घडली. इमारतीच्या तळमजल्यावर असलेल्या दवाखान्यात स्लॅबचा भाग कोसळला. दवाखान्यात आलेल्या रुग्णांच्या अंगावर हा स्लॅब कोसळून काही जण दबले गेले. या दुर्घटनेत ३ जणांचा मृत्यू झाला तर ८ जण जखमी झाले आहेत.

दरम्यान, अग्निशमन दलाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले असून बचावकार्य सुरु आहे. जखमींना नजीकच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. उल्हासनगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरु केला आहे. दुसऱ्या आणि तिसऱ्या मजल्यावरील स्लॅब कोसळून तो तळमजल्यावर आल्याचे प्राथमिक माहितीतून कळते आहे.