उल्हासनगरातील स्काय वॉकवर तरूणाला चॉपरने वार करून लुटले

0

उल्हासनगर: उल्हासनगर शहरात भरदिवसा लुटमारींच्या घटना घडत असून रेल्वे स्टेशन परिसरातील स्काय वॉकवर देखिल प्रवाश्यांना मारहाण करून लुटण्याचे प्रकार सातत्याने घडत असताना भरदिवसा मंगळवारी सायंकाळी ऐसी रिपीयर करणा-या तरूणाला स्काय वॉकवर ३ जणांच्या टोळीने अडवून त्याच्यावर चॉपरने वार करून मोबाईलफोनसह रोख रक्कम लुटून नेल्याची घटना घडली आहे.

मिळालेल्या माहितीनूसार मांडा टिटवाळा येथे राहणारा मोहोम्मद अब्दुल रहिम वारिसअलि शेख (२६) हा तरूण कल्याण येथिल चिकणघर परिसरात असणा-या नाहुर इंटरप्राईसेस या सर्विस सेंटरमध्ये काम करतो. रहिम हा ऐसी रिपीयरींगचे काम करीत असल्यामुळे कंपनीने त्याला उल्हासनगर कॅम्प नं. ४ येथे पाठवले होते. रहिम हा त्याचा सहकारी सुफियान इंद्रिस याच्यासोबत त्याठिकाणी काम करायला गेला होता. सायंकाळी साडेचारच्या सुमारास ते दोघेही काम पुर्ण झाल्यावर उल्हासनगर रेल्वे स्टेशनजवळील स्काय वॉकवरून प्लॅटफॉर्म नं. १ वर येत होते. त्यावेळी स्काय वॉकवर उभे असलेल्या ३ तरूणांनी रहिम याला अडवले व त्याच्याजवळील पैशाचे पॅकेट व मोबाईल फोन मागितला. रहिम याने देण्यास नकार दिल्याने त्या तिघांनी त्याला मारहाण करीत आपल्याजवळील धारदार चॉपरने रहिम याच्यावर वार करून जबरदस्तीने त्याच्याजवळील मोबाईल व रोख रक्कम चोरून नेली. रहिम हा रक्ताच्या थारोळयात त्याठिकाणी पडला होता. त्याचा मित्र इंद्रिस याने आरडाओरडा केल्यावर रेल्वे स्थानकात डयुटीवर असलेल्या हवा.भैरकदार यांनी त्याठिकाणी धाव घेतली. जखमी झालेल्या मोहम्मद अब्दुल रहिम याला प्रथम उल्हासनगरातील मध्यवर्ती रूग्णालयात उपचारासाठी दाखल केले. पण त्याची प्रकृती चिंताजणक असल्याने त्याला कल्याण-मुरबाड रोड येथिल सिध्दीविनायक हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणी कल्याण लोहमार्ग पोलिस ठाण्यात रात्री उशीरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. उहासनगरातील स्काय वॉकवर लुटमारीचे प्रकार सातत्याने घडतअसल्याने नागरीक व प्रवाश्यांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहेत. रेल्वे स्थानकातील स्काय वॉकवर सिसिटिव्ही कॅमेरे बसविण्यात यावे अशी मागणी शिवसेना शाखाप्रमुख नासिर खान यांनी केली आहे. रात्रीच्या सुमारास स्काय वॉकवरील लाईट बंद असल्यामुळे अनैतिक प्र्रकार चोरी व लुटमारीच्या घटना घडत असतात. स्काय वॉकवर पोलिसांचा गस्त नसल्यामुळे हे प्रकार घडत असल्याचे नागरीकांमध्ये बोलले जात आहे. दिवसा या स्काय वॉकवर तरूण-तरूणींचा अश्लील हैदोस तर रात्री व सायंकाळच्या सुमारास लुटमारीच्या घटना घडत असतात.

मटका जुगारावर धाड : ३ जणांवर कारवाई
उल्हासनगर : शहरातील कॅम्प नं. २ येथिल फक्कड मंडी चौक माता मंदिराजवळील झाडाखाली सुरू असलेल्या मटका जुगारावर उल्हासनगर पोलिसांनी धाड टाकली. त्यावेळी विजय लबदे हा शंकर नावाच्या इसमाकरीता द्वारकानाथ व दिपक यांच्याकडून मटका जुगाराचे पैसे स्विकारताना पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. पोलिसांनी मटका जुगाराची साधने, ८८० रूपयांची रोख रक्कम जप्त केली. याप्रकरणी विजय , द्वारकानाथ, दिपक या चौघांविरूध्द उल्हासनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून तिघांना पोलिसांनी ताब्यात घेऊन कारवाई केली. तर शंकर याचा शोध पोलिस घेत आहेत. अधिक तपास स.पो.उप.नि.ढेमरे करीत आहेत.