उल्हासनगरात हुक्का पार्लरवर धाड : ३ जणांवर कारवाई

0

उल्हासनगर : शहरातील कॅम्प नं. २ येथील नेहरू चौक परिसरात सुरू असलेल्या हुक्का पार्लरवर उल्हासनगर पोलिसांनी धाड टाकून ४ जणांविरूध्द गुन्हा दाखल करून ३ जणांना अटक करून १९ हजार ६१० रूपयाचा माल जप्त केला आहे. नेहरू चौक परिसरात हुक्का पार्लर सुरू असल्याची गुप्त माहिती पो.नि.एस.पी.आहेर यांना मिळाली होती. त्या माहितीवरून स.पो.नि.चौधरी, पो.उप.नि.पाटील, पो.शि.अजय पाटील व डी.बी.स्टॉफ यांनी सायंकाळी पाहुणे ६ च्या सुमारास त्या हुक्का पार्लरवर धाड टाकली. विनापरवाना हुक्का पार्लर व धाबा चालवून लहान बालकांना तंबाखु जन्य व नशेली पदार्थ हुक्का पॉटमध्ये ओढण्याकरीता टाकून देत असताना व ओढत असताना पोलिसांना त्याठिकाणी दिसून आले. याप्रकरणी पोलिसांनी त्याठिकाणाहून जवळपास १९ हजार ६१० रूपयाचा माल जप्त केला असून त्या हुक्का पार्लरमधील ७ ते ८ अल्पवयीन मुलांना ताब्यात घेऊन त्यांना ताकिद देऊन सोडण्यात आले.

याप्रकरणी हुक्का पार्लर मालक तरूण पाटील याच्यासह करूण ईच्छप्राणी(२७), अनिल ढेमला(३०) व जागा मालक चौधरी या ४ जणांविरूध्द उल्हासनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून ३ जणांना अटक करण्यात आली आहे. अधिक तपास पो.उप.नि.पाटील करती आहेत.