उल्हासनगर पालिकेत चार दाम्पत्यांची एन्ट्री

0

उल्हासनगर । उल्हासनगर महापालिकेच्या एकूण 78 जागांसाठी निवडणूक प्रक्रिया पार पडली. निवडणुकीचा निकाल जाहिर झाला आहे. उल्हासनगर महापालिकेच्या निवडणुकीत चार जोडप्यांनी निवडणूक जिकत एक आगळावेगळा इतिहास घडवला आहे.त्यातच यंदाचे महापौरपद महिलांसाठी राखीव असल्याने कलानी व आयलानी गटात चुरस निर्माण झाली आहे. महापालिकेत भाजपची मुसंडी मारली तर सेना दुसर्‍या क्रमांकावर आहे.

उल्हासनगर महापालिकेचा अंतिम निकाल
तर महापालिकांप्रमाणेच भाजपने उल्हासनगरमध्येही सत्ता आणण्यासाठी कंबर कसली होती. भाजपने इथे टीम ओमी कलानीची साथ घेतली होती. अखेर भाजपला या प्रयत्नात यश आले, असंच म्हणावे लागेल.उल्हासनगर महापालिकेत यंदाही कलानी आणि आयलानी आहेत. पॅनल 2 मधून ओमी कलानी यांची पत्नी पंचम कलानी निवडून आल्या आहेत. तर पॅनल 5 मधून भाजप जिल्हाध्यक्ष कुमार आयलानी यांच्या पत्नी मीना आयलानी नगरसेविका झाल्या आहेत. यंदाचे महापालिकेचे महापौरपद हे सर्वसाधारण महिलेसाठी आरक्षित असल्यामुळे दोन्ही गटांमध्ये चुरस असणार आहे. 2007 मध्ये उल्हासनगर महापालिकेत 17 नगरसेवक निवडून आणत साई पक्षाने महापौरपद ताब्यात घेतलं होतं. नंतर पक्षात फूट पडल्याने 2012 मध्ये साई पक्षाचे सातच नगरसेवक निवडून आले. असं असतानाही त्यांनी अडीच वर्ष महापौरपद मिळवलं होतं. आता पुन्हा शिवसेना आणि भाजपा हे प्रमुख पक्ष बहुमतापासून दूर राहिल्यामुळे 11 नगरसेवक निवडून आणणार्‍या साई पक्षाला सोन्याचा भाव आला आहे.