उल्हासनगर मनपामध्ये धर्माच्या नावाखाली झोल -झोल ?

0

उल्हासनगर- उल्हासनगर महापालिका आणि भ्रष्टाचार यांचे नाते नाते अतूट असल्याचे मागील काही दिवसांत दिसून येत आहे. करघोटाळा, एलबीटि घोटाळा किंवा रस्त्यांवरील खड्डे भरण्याचा घोटाळा असो सारया घोटाळ्यांत उल्हासनगर महापालिका पुढे असल्याचे चित्र समोर येत आहे. नुकत्याच पुढे आलेल्या खड्डे घोटाळ्यामुळे उल्हासनगर महापालिका पुन्हा चर्चेत आली आहे.

गौरी गणपतेच सण अगदी काही दिवसांनवर येऊन ठेपला आहे तर सोबतच सिंधी बांधवाचा चालिया हा सण ही जवळ आळा आहे. सणाना अडथळा नको म्हणून शहरातील खड्डे भरण्यासाठी उल्हासनगर महापालिकेने विना निविदा काढताच साडेचार करोड रुपयांची कामे कंपन्यांना दिली असल्याची चर्चा सर्वत्र आहे. ज्या दोन कंपन्यांना ही कामे देण्यात आली आहेत त्यांच्याकडून कमिशन उकळण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभाग आणी सत्ताधारी यांनी विनानिविदा हे टेंडर काढल्याचा आरोप होत आहे.

साडेचार करोडचा निधी चार प्रभाग समित्यांनी जय भारत व झा पी नावांच्या कंपनीला वाटून देण्यात आले आहेत. हे प्रस्ताव पालिकेच्या प्रशासनाने मंजूरी साठी स्थायी समितीला पाठविले आहेत. मात्र लोकांमध्ये पालिकेच्या या भ्रष्टाचाराबद्दल बद्दल बरीच चर्चा आहे. मात्र पालिका आयुक्त राजेंद्र निबांळकर यांनी या भ्रष्टाचाराचे आरोप फेटाळले असून असे काहीच घडले नसल्याची खात्री दिली आहे.

मनसेची लाघुनिविदा काढण्याची मागणी
पालीका आयुक्ताना 73 ड अंतर्गत 25 लाख रूपयांपर्यंत विना निविदा काम देण्याचा अधिकार आहे. यामुळे नियम 5(2) (2) च्या अंतर्गत स्थायी समिती तब्बल साडे चार करोड रूपयाची कामे निविदा न करता थेट ठेकेदाराला देऊ शकत नाही. या कामात मोठया प्रमाणात स्थायी समिती सभापती कांचन लुंड आणि सदस्यानी भ्रष्टाचार केला असल्याचा आरोप महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हा उपाध्यक्ष सचिन कदम यानी केला आहे. तसेच याबाबत मनसेच्या शिष्टमंडळाने पालीका आयुक्त राजेंद्र निबांळकर यांची भेट घेत सदरचा ठराव विखंडीत करण्यासाठी शासनाकडे पाठवावा व गणेशोत्सवाला 20 दिवस असल्याने लघुकाळ निविदा काढून काम द्यावे, अशी मागणी केली आहे.