उल्हासनगर महापालिका पोटनिवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर घोडेबाजार तेजीत

0

उल्हासनगर । उल्हासनगर महापालिकेची पोटनिवडणुक 6 एप्रिल रोजी होत आहे. मात्र दिवस मावळताच निवडणूक अधिकारी व दक्शता पथकाचे दुर्लक्ष होत असल्यामुळे शहरात रात्रीच्या वेळेस घोडेबाजाराला तेजी मिळत असून सर्वच राजकीयपक्श मतदार खरेदी करण्यासाठी जोरदार प्रयत्न करत असल्याचे पहायला मिळते आहे. एकगठ्ठा मतदान व्हावे म्हणून युवकांच्या ग्रुपला व मंडळांना आमिष दाखविण, दारूच्या पार्ट्या देणे, पैशाचे वाटप आदी प्रकार राजरोसपणे सुरू आहेत. सामान्य नागरिकांना उघडपणे दिसत असलेल्या या सर्व प्रकारांकडे निवडणूक अधिकारी मात्र जाणूबुजून झोपे सोंग घेऊन दुर्लक्ष करीतआहे. त्यामुळे या अधिकार्‍यांवर कोणाचे दडपण आहे का अशी चर्चा रंगली आहे.

निवडणूकीची तारीख जसजशी जवळ येत आहे तसतशी राजकीय समीकरणांमध्ये बदल घडत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक सतरामदास जेसवणी यांनी निवडणूकीपासून अलिप्त राहण्याची भूमिका घेतली आहे. कलानी परिवाराशी असलेल्या सख्यामुळे त्यांनी हा निर्णय घेतला असून त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या गटात खळबळ उडाली होती. शिवसेनेने व आरपीआयने आपले उमेदवार न उभे करता राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराला पाठिंबा दिला आहे असे शिवसेना शहर प्रमुख राजेंद्र चौधरी यांनी सांगितले. त्यामुळे शहारातील सेनेचे नेते काँग्रेसचा प्रचार करत असल्याचे पहायला मिळणार आहे. साई पार्टीचे प्रमुख जीवन यांनी आपला उमेदवार निवडणुकीत उभा केला नसून ते कोणत्या पक्शाला पाठिंबा देणार हे त्यांनी अजून गुलदस्त्यात ठेवले आहे . जीवन इदानानी यांनी सांगितले की, टीम ओमी कालानी, भाजप म्हणते की आपण त्यांना पाठिबा दिला आहे. त्यांनी उत्तर दिले लोक काही बोलतील. माझ्या पक्शाचा पाठींबा कोणाला हे 1एप्रिल रोजी जाहीर करणार आहे. त्यामुळे ते कोणाला पाठिंबा देतात की एप्रिल फूल करतात याकडे शहराचे लक्ष लागले आहे. सर्वच पक्शांनी ही निवणुक प्रतिष्ठेची केल्यामुळे ही निवडणूक तिरंगी होणार असून, चुरस वाढत चालली आहे.

कार्यकर्त्यांमुळे नागरिकांना त्रास
टीम ओमी कलानी,भाजपचे उमेदवार साक्षी पमानानी यांचे कार्यालय त्यांचे भाऊ रोशन वलेचा यांच्या दुकानात थाटले असल्याने त्या ठिकाणी हजेरी लावण्यासाठी सर्व आजी, माजी नगरसेवक कार्यकर्ते गर्दी करत आहे. हे कार्यकर्त्ते आपली वाहने बाजुला पार्क न करता रस्त्याच्या दुतर्फा उभी करत आहेत. त्यामुळे निर्माण होणार्‍या वाहतूक कोंडीतून मार्ग काढताना पादचारी व वाहनधारकांना मोठी कसरत करावी लागत आहे. या त्रासाला लोक कंटाळले असुन लोकांमध्ये नाराजी पसरत चालली आहे. या नाराजीचा फटका टीम ओमी कलानीच्या उमेदवार साक्षी पमनानी यांना बसू शकतो. वाहतूक कोंडीकडे कार्यकर्ते किंवा आजी माजी नगरसेवक लक्ष देत नाहीत उलट कार्यालयात बसुन गप्पा मारत बसलेले असतात.वाहतूक कोंडीत अडकलेले वाहनधारक व जनता त्यांच्या तोंडाकडे त्रासून बघत असतानाही त्यांच्या या नजरांकडे कार्यकर्ते दुर्लक्श करत असल्याचे पहायला मिळते.