भुसावळ । डॉ. उल्हास पाटील इंग्लिश मिडीयम स्कुलमध्ये क्रीडा दिवस उत्साहात साजरा करण्यात आला. संस्थाध्यक्ष माजी खासदार डॉ. उल्हास पाटील, सचिव डॉ. वर्षा पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. प्रमोद भिरुड, मुख्याध्यापिका अनघा पाटील व्यासपीठावर होत्या. विद्यार्थ्यांनी मशालज्योत मैदानामध्ये फिरवून कार्यक्रमाची सुरुवात केली. विद्यार्थ्यांची चार गटात विभागणी करण्यात आली. यात रेड, ब्ल्यू, ग्रीन आणि एलो असेे गृप तयार करुन चार गटात स्पर्धा पार पडल्या.
500 विद्यार्थ्यांनी नोंदविला सहभाग
विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट प्रकारे ड्रील सादर केले. 500 विद्यार्थ्यांनी यामध्ये सहभाग नोंदविला. इयत्ता पहिली ते दहावी पर्यंतच्या विद्यार्थ्यांनीदेखील विविध प्रकारच्या खेळांमध्ये सहभाग घेतला.