जळगाव । कामाच्या वेळेपेक्षा उशिरा कामावर येणार्या 31 मनपा कर्मचार्यांची हजेरी जिल्हाधिकारी तथा आयुक्त किशोर राजे निंबाळकर यांनी घेतली. सकाळी 9.30 वाजता आयुक्त निंबाळकर हे मनपाच्या प्रवेश द्वाराजवळ बसून होते. वेळ झाल्यानंतर आलेल्या कर्मचार्यांना त्यांनी बोलावून आपल्यावर बडतर्फीची कारवाई का करण्यात येवू नये अशी तंबी दिली. तसेच सायंकाळी 31 जणांना शिस्तभंगाची कारवाई का करण्यात येवू नये अशा नोटीसा बजाविण्यात आल्या. नोटीसात नमुद करण्यात आले आहे की, आज दि. 8 मे रोजी सकाळी 10 ते 10.15 वाजेदरम्यान आयुक्त किशोर राजे निंबाळकर यांनी कर्मचार्यांची उपस्थिती तपासली असता यावेळी 31 कर्मचारी कार्यालयात वेळेवर उपस्थित नसल्याचे दिसून आले. ही बाब कार्यालयीन शिस्तीस धरुन नसल्याने आपणाविरुध्द शिस्त भंगाची कार्यवाही का करण्यात येऊ नये याबाबत सदर नोटीस मिळल्यापासून 24 तासाच्या आत खुलासा करावा, विहीत मुदतीत व समाधानकारक खुलासा न आल्यास आपले काही एक म्हणणे नाही, असे गृहीत धरुन मुंबई महानगरपालिका अधिनियम 1949चे कलम56 नुसार शिस्तभंगाची कार्यवाही करण्यात येईल याची गांभिर्याने नोंद घ्यांवी, असे नुमद केले आहे. त्यामुळे 24 तासात समाधान कारक उतर कर्मचार्यांनी सादर करावयाचे असून तसे न झाल्या त्यांना कारवाईला सामोरे जावे लागणार आहे.
’ढ‘ कर्मचार्यांच्या विनवण्या
कामावर उशिरा पोहचल्यामुळे अशा कर्मचार्याना आयुक्तांनी आपल्या दालनात बोलविले व उशिरा येण्याचे कारणे विचाले. त्यावर कर्मचार्यांनी वेगवेगळी कारणे सांगून आज आमच्याकडून चुक झाली आहे. पुन्हा अशी चुक होणार नाही, आम्हाला एवढ्या वेळेस माफकरा अशी माफी मागीतली. मात्र आयुक्तांनी बडतर्फ करण्याची तंबी दिल्यांने त्यापैकी काही जणांनी अंश्रृ गाळायला सुरुवात केली होती.