पुणे : जुन्नर तालुक्यातील वाळूंजवाडी शिवारातील एका शेतकर्याच्या गाईचा आकस्मिक मृत्यू झाला असून, उष्माघाताने हा मृत्यू झाला असल्याचा प्राथमिक अंदाज आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. उष्णतेचा पारा चढला असल्याने जनावरांना उष्माघात होण्याचा संभव असून, शेतकर्यांनी आपली जनावरे चांगल्या झाडाखाली सावली असलेल्या ठिकाणी बांधावीत, असे आवाहन पशुवैद्यकीय अधिकार्यांनी केले आहे.