भुसावळ। येथील जामनेर रस्त्यावरील मुक्ताई होमीओपथी क्लिनिक मध्ये 10 रोजी समर्थ सर्वांगीण विकास संस्था, गणराया प्रतिष्ठान व श्री फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत उष्माघात प्रतिबंधक होमीओपथीक औषध मोफत वितरण शिबीराचे आयोजन करण्यात आले होते.
शिबीराचे उद्घाटन राजेश पाटील व किरण मिस्त्री यांच्या हस्ते डॉ.सम्युअल हनेमन व आदिशक्ती संत मुक्ताबाई यांच्या प्रतिमेस माल्यार्पण करुन झाले. या शिबीरात होमीओपथी तज्ञ डा.विजयकुमार वारुळकर यांंनी उष्माघाताची लक्षणे, प्रारंभीक उपचार, बचावाची उपाय यावर मार्गदर्शन करुन होमीओपथीक औषधांचे वितरण करण्यात आले. उष्माघात प्रतिबंधक शिबीराचा 120 रुग्णांनी लाभ घेतला. शिबीराच्या यशस्वीतेसाठी मिलींद फेगडे, अनिकेत सोनवणे, रवि पवार, पंकज सोनार, तुषार सरोदे, रवि वरणकर, राजकुमार ठाकुर, गोपाळ देशमुख, कुणाल ठाकुर, बाबा शाह आदींनी परिश्रम घेतले.