उसतोड कामगारांच्या मुलांना शैक्षणिक साहित्य वाटप

0

फैजपूर  । साखर कारखान्याचा ऊस गळीत हंगाम संपल्याने येथील ऊसतोड कामगार परतीला निघाले असून त्यांच्या मुलांच्या शिक्षणात खंड पडू नये, सातत्य राहावे यासाठी कारखान्याचे संस्थापक चेअरमन कै. जी.तु. महाजन, माजी शिक्षणमंत्री मधुकरराव चौधरी यांच्या स्मरणार्थ शालेय साहित्य व विविध बक्षिस वितरण करण्यात आले. याप्रसंगी शशिकला चौधरी, कल्पना पाटील, ललित राणे यांनी खाद्यपदार्थ वाटप केले. सुधाकर चौधरी यांनी बालकांच्या माता-पित्यांशी संवाद साधून त्यांना गावाकडील शाळेत पाठविण्याचे आवाहन केले.

यांनी केले सहकार्य

रेखा भंगाळे यांनी गाण्यांचे पुस्तक वाटप केले तर शालेय साहित्यासह गणवेश वितरणासाठी स्वामीनारायण सत्संग समाज, संत नवीन सागर शिष्यमंडळ, हेमा गाजरे, आनंद ज्ञानप्रबोधिनी, प्रकाश रननवरे, अनंत चौधरी, मिलींद चौधरी, मनिषा चौधरी, जयश्री इंगळे यांनी सहकार्य केले. याप्रसंगी ऊसतोड कामगार विष्णू बुधवंत, कपिल त्रिभुवन, दिपक राठोड, सुमित राठोड, अजय खिल्लारे आदी उपस्थित होते. यशस्वीतेसाठी कृष्णा भारंबे, अजय बढे यांनी सहकार्य केले.