A person was beaten up for a minor reason in Bhusawal भुसावळ : शहरातील सोना एजन्सीजवळील महादेव मंदिराजवळ उसनवारीचे पैसे मागितल्याच्या कारणावरून एकास मारहाण करण्यात आल्याची घटना 1 रोजी सकाळी 11 वाजता घडली. या प्रकरणी एकाविरोधात बाजारपेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.
उसनवारीचे पैसे मागितल्याने मारहाण
समर मुनदार बठेजा (62, आनंद नगर, भुसावळ) यांच्या तक्रारीनुसार, संशयीत आरोपी सुनील मोहनदास नैनानी (सिंधी कॉलनी, भुसावळ) याने उसनवारीचे पैसे मागितल्याच्या कारणावरून रीक्षातील स्टीलच्या पाईपाने डोक्यावर व छातीवर मारहाण करीत दुखापत केली. तपास हवालदार विजय नेरकर करीत आहेत.