Forest laborer assaulted in Usmal for blocking a vehicle transporting illegally felled wood : Case against the trio यावल : सातपुड्याच्या कुशीत असलेल्या उसमळी येथील वनमजुराने वन क्षेत्रातून अवैधरीत्या लाकूडतोड करून नेत असलेली गाडी अडवल्याने त्याचा राग येऊन तिघांनी त्याला मारहाण केली व जीवे ठार मारण्याची धमकी दिली. या प्रकरणी तीन जणांविरुद्ध यावल पोलिसात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला.
तिघांविरोधात गुन्हा दाखल
सातपुड्याच्या कुशीतील ऊसमळी या आदिवासी पाड्यातील वनक्षेत्रात तात्पुरत्या स्वरूपात वनमजूर म्हणून ग्यारसिंगलाल मगन बारेला हा कार्यरत आहे. वन क्षेत्रातून दारा खेत्या पावरा, टकल्या दारा पावरा व रावण दारा पावरा (सर्व रा.आंबापाणी) हे वृक्षतोड करून लाकडाने भरलेली गाडी घेऊन जात असताना गाडी अडवल्याने तिघांनी त्याला चापटा-बुक्क्यांनी मारहाण केली व तुला जिवंत ठेवणार नाही, अशी धमकी दिली तेव्हा याप्रकरणी ग्यारसिंलाल बारेला यांनी दिलेल्या फिर्यादीवरून यावल पोलीस ठाण्यात तिघांविरुद्ध अदखलपात्र गुन्हा नोंदवण्यात आला.