उसाचे थकित पेमेन्ट त्वरित अदा करण्याची मागणी

0

चोपडा – शेतकरी कृती समितीची बैठक विश्रामगृह चोपडा येथे घेण्यात आली. यावेळी या बैठकीत विविध विषयावर चर्चा करण्यात आली. शेतकर्‍यांच्या चोपडा साखर कारखान्याच्या थकीत उसाच्या पेमेंटचे धनादेश 10 ऑक्टोंबरचे दिलेले होते ते जर 10 जानेवारीपर्यंत शेतकर्‍यांनी खात्यात जमा करण्यासाठी टाकले नाहीत तर त्यांची किंमत झिरो होईल म्हणून शेतकर्‍यांनी सोमवारपर्यंत बँकेत टाकावीत तसेच ज्यांचे धनादेश वटले नाहीत त्यांनी एक महिन्याच्या आत नोटीस देणे बंधनकारक होते. विविध मागण्यांचे निवदेन देण्यात आले. अन्यथा 26 जानेवारी रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण करण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे. अडावद कृउबा समितीत कांदा विकलेल्या 102 शेतकर्‍यांची फसवणूक करून तुषार धनगर या व्यापार्‍याने फसवणूक केली त्यांना न्याय मिळवून द्यावा अशा आशयाचे निवेदन तहसीलदार दीपक गिरासे यांना दिले.

कंपनीला नोटिसा दिल्यानंतर एका महिन्याच्या आत गुन्हा नोंदवला पाहिजे, त्यानुसार पुढील आठवड्यात व्यक्तिगत गुन्हे नोंदवले गेले पाहिजेत. त्यासाठीची कायदेशीर मदत कृती समितीकडुन उपलब्ध करून देणार आहेत व तसे काही शेतकर्‍यांनी गुन्हे नोंदवले देखील.ज्या शेतकर्‍यांच्या ऊस उभे आहेत व त्यांना ऊसतोडीबाबत अडचणी असल्यास कृती समितीकडे नावे नोंदवावीत म्हणजे पुढील आठवड्यात सर्व कारखानदारशी चर्चा करून संयुक्तिक बैठक ठेऊन नियोजन केले जाणार आहे.

यांची होती उपस्थिती
यावेळी एस.बी.पाटील, ड.एस.डी.सोनवणे, भास्कर पाटील, भरत पाटील, अनिल वानखेडे, राजेंद्र पाटील, अविनाश पाटील, अरुण चौधरी, अजित पाटील, हुकूमचंद पाटील, वासुदेव पाटील, श्याम पाटील, ईश्वर महाजन, अरुण पाटील, रणजित निकम, सुभाष पाटील, साहेबराव पाटील, प्रवीण पाटील, दिलीप पाटील, हुकूमचंद पाटील, शैलेश पाटील, पंडित पाटील, शांताराम पाटील, चंद्रशेखर पाटील, गजानन पाटील, दिलीपसिंग सिसोदिया, जितेंद्र कोळी, लक्ष्मण पाटील, विवेक तळेले, नामदेव पाटील यांच्यासह असंख्य शेतकरी उपस्थित होते.