उस्मानाबादकरांनी आपल्याला दिली ङ्गनवसंजीवनीफ !

0

मुंबई (दीनानाथ घारपुरे/सुलभा देशपांडे नाट्यनगरी) : आपल्या जीवनात अनेक सुख-दुःखाच्या घटना घडल्या आहेत. नाट्यसंमेलनाध्यक्ष पदापर्यंत पोहोचू असे स्वप्न आपण कधीच पाहिले नव्हते, उस्मानाबादकरांनी मला खरोखरीच नवसंजीवनी दिली. अध्यक्षीय भाषण करताना मी भावनावश झालो होतो, माझ्या सहा दशकांच्या कालखंडात मी खचून न जाता अडथळ्यांच्या शर्यतीमध्ये संघर्ष करीत जीवन जगलो, अशा शब्दांत 97 व्या अ.भा. नाट्यसंमेलाचे अध्यक्ष जयंत सावरकर यांनी त्यांच्या प्रकट मुलाखतीत त्यांच्या आयुष्याचा प्रवास उलगडून सांगितला. संमेनलाच्या दुसर्‍या दिवशी संमेलनाध्यक्ष सावरकर यांची ही प्रकट मुलाखत आजच्या दिवसाचे विशेष आकर्षण ठरले. नाटकात लहान मोठी कामे मिळत होती, ती करीत असताना सर्वच गोष्टीत मी आनंद घ्यायला शिकलो, मला अविनाश खर्शीकर, विलास गुर्जर, सुधाकर भानुशे पुण्याचे सुनील महाजन यांची मोलाची साथ मिळाली, मला शारदा नाटकातील श्रीमंत ची भूमिका आणि खडाष्टक नाटकातील कर्कशराव ची भूमिका करावयची आहे. केवळ नाटकांनी मला जीवंत ठेवले आहे, असेही सावरकर म्हणाले.

डॉ. वि.भा. देशपांडे रंगमंच येथे एकांकिका महोत्सवही साजरा झाला. ह्या महोत्सवाचे उद्घाटन ज्येष्ठ रंगकर्मी प्रदीप कबरे यांनी केले. कलाकार घडविण्याचे काम एकांकिका करीत असतात, ह्या रंगमंचाची काळजी उस्मानाबादकरांनी घ्यायला हवी, या ठिकाणाचा उस्मानाबादसह बीड, तुळजापूर, सोलापूर आणि इतर भागातील रंगकर्मींनी उपयोग करून घ्यायला हवा, असे कबरे यावेळी म्हणाले.

सुलभा देशपांडे नाट्यनगरीत आज सकाळपासून रात्रीपर्यंत विविध सांस्कृतिक कार्यक्रम व एकांकीका यांची रेलचेल होती. याचा उपस्थित नाट्यरसिकांनी भरभरून आस्वाद घेतला. यावेळी स्थानिक लहान-थोर कलाकारांनी त्यांची कला सादर केली, संध्याकाळी विजय कदम यांच्या ‘खुमखुमी’ ह्या कार्यक्रमालाही चांगला प्रतिसाद मिळाला,