उस्मानाबाद जिल्ह्यात महिलेची निर्वस्त्र धिंड काढल्याचा निषेध

0

चाळीसगाव शहर पोलीस निरीक्षकांना मागणीचे निवेदन

चाळीसगाव – उस्मानाबाद जिल्ह्यातील उपळाई गावी एका मुलाने प्रेम विवाह केल्याने त्याची शिक्षा म्हणुन मुलाच्या आईची विवस्त्र धिंड काढल्याची निंदनीय घटना दिनांक १२ जानेवारी रोजी जिजाऊ जयंती दिनीच घडल्याने या घटनेचा निषेध चाळीसगाव येथे महाविद्यालयीन तरुण व भागवत पाटील मित्र मंडळाच्या वतीने करण्यात आला असुन यातील गुन्हेगारांना कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी निवेदनाद्वारे चाळीसगाव शहर पोलीस निरीक्षकांकडे करण्यात आली आहे.

काय म्हटले आहे निवेदनात
निवेदनात म्हटल्याप्रमाणे, ज्या शिवाजी महाराजांच्या स्वराज्यात १२ जानेवारी रोजी अखंड हिंदुस्थानात राष्ट्रमाता जिजाऊ यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी केली त्याच दिवशी उस्मानाबाद जिल्ह्यात उपळाई गावी एका प्रतिष्ठीत व्यक्तीच्या मुलीसोबत एकाने प्रेम विवाह केल्याचा राग येवुन त्याची शिक्षा म्हणुन त्या मुलाच्या आईची गावात निर्वस्त्र धिंड काढण्यात आली या गोष्टीला कोणीही वाचा फोडली नाही व गुन्हाही दाखल केला नाही सदर महिला कोणत्याही समाजाची असो तिच्या सोबत असा घाणेरडा प्रकार घडतो याचा निषेध करुन यातील गुन्हेगारांना कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी करण्यात आली आहे.

निवेदनावर यांच्या स्वाक्षऱ्या
निवेदनावर महाविद्यालयीन तरूण, तरुणी व भागवत पाटील मित्र मंडळाचे भागवत बाळु पाटील, अश्विनी पगार, रुपाली पवार, प्राजक्ता शिंपी, शैलेश मोरे, अतुल चौधरी, परमविर राजपुत, रोहीत सावंत, प्रसाद रावते, विपुल राजपुत, घनशाम चौधरी, राहुल राठोड, शुभम राठोड, भूपेंद्र पाटील, उमेश भोई, शुभम लासुरकर, अमोल बिडवे, पवन वाघ, भूषण राजपुत, शैलेश तुपे, पंकज पवार, अजय गांगुर्डे, गणेश वाघ यांच्या सह्या आहेत.