जळगाव शहरात दहशदीचे वातावरण ; उस्मानिया पार्क येथे घरासह दोन दुकाने फोडली
दागिन्यांसह रोकड, लॅपटॉप लंपास
जळगाव- उस्मानिया पार्क येथे रविवारी मध्यरात्री चोरट्यांनी एक दुकान व दोन घरे फोडून ऐवज लांबवला. सोन्याचे दागिने, रोकड, लॅपटॉप आणि टॅबसह इतर मुद्देमालाच चोरट्यांनी लांपास केला आहे. सोमवारी सकाळी सात वाजता या घटना उघडकीस आल्या. त्यामुळे उस्मानिया पार्कमध्ये प्रचंड खळबळ उडाली आहे.
याबाबत माहिती अशी की, ममुराबाद रोडवरील उस्मानियॉ पार्क येथे रविवारी मध्यरात्री चोरट्यांनी धुमाकुळ घातला. यात फिरोज मोहम्मतद रफिक बागवान हे पुण्याला गेले होते. तर त्यांचे कुटुंबीय बागवान मोहल्ल्यात नातेवाइकांकडे मुक्कामी होते. चोरट्यांनी त्यांच्या बंद घराचा मागचा दरवाजा तोडून आत प्रवेश केला. घरातील लोखंडी कपाट तोडून घरातील 4 तोळ्याच्या दोन सोन्याचे पोत, 10 हजार रूपये रोख आणि पैशांचा गल्ला चोरून नेला. बागवान यांच्या शेजारी मोहम्मद जुबेर शेख रफिक यांचे कादरिया ट्रेडर्स या दुकानात कोल्ड्रीग्जचे होलेसेल दुकान आहे. या ठिकाणी देखील चोरट्यांनी मागच्या दरवाजाचा कडी कोयंडा तोडून आत प्रवेश करत एक लॅपटॉप, मोबाईल टॅबलेट आणि 80 हजार रूपयांची रोकड चोरली. तर या दुकानाच्या बाजुला राहणारे नावेद अहमद शेख नासिर (वय 34) हे कुटुंबीयांसह नाशिक येथे लग्नाला गेले होत. नावेद शेख यांच्या घराच्या मागचे लोखंडी दरवाजा चोरट्यांनी तोडून घरातील लोखंडी कपाट तोडले. यात कपाटातील सामान अस्तव्यस्त करून 8 ग्रॅम सोन्याची पोत, 2 सोन्याच्या अंगठ्या, अर्धाकिलो चांदीचे दागिने आणि 20 हजार रूपयांची रोकड लांबवली. या घटना सोमवारी सकाळी उघडकीस आल्या. यानंतर शहर पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक सर्जेराव क्षिरसागर, विजय निकुंभ, तेजस मराठे, भास्कर ठाकरे, उमेश भांडारकर, रतन गिते यांनी घटनास्थळी धाव घेवून पाहणी केली. या प्रकरणी शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.