जळगाव । शहर व जिल्ह्यात आठवडाभरापासून दुपारनंतर उष्ण झळांचा कहर सायंकाळपर्यंत डोक्यावर घ्यावा लागत असल्याने मोटारसायकलींवरचा प्रवास टाळण्याकडेच लोकांचा कल आहे. घटलेल्या आर्द्रतेने ही उष्ण झळांची मनमानी वाढवलेली आहे. जैन उद्योगसमुहाच्या हवामान केंद्रात आजच्या (14 एप्रिल) कमाल तापमानाची नोंद 45 व किमान 26 अंशांची झालेली होती.
चाळीसगाव 41 अंश
जिल्ह्यात जळगाव, भुसावळ, चोपडा, एरंडोल,जामनेर, मुक्ताईनगर, पारोळा, पाचोरा, यावल, फैजपूर या ठिकाणी 45 अंशांची नोंद झाली.अमळनेर , भडगाव, धरणगाव, वरणगाव, सावदा, रावेर येथे 44 अंश; बोदवड येथे 43 अंश व चाळीसगावात 41 अंशांची नोंद झाली. स्थानिक हवामान घटकांमुळे या नोंदींपेक्षाही अंदाजे 3 अंशांनी तापमानाची तीव्रता जास्त जाणवू शकते, असे हवामान खात्याकडून सांगण्यात आले. हवेतील उच्च आर्द्रतेमुळे मुंबईकरांना बेचैनी जाणवत आहे. येत्या काही दिवसात पारा दोन अंशांनी वाढण्याची चिन्हे आहेत.