ऊर्जामंत्री डॉ.नितीन राऊत यांच्या आवाहनास शेतकऱ्यांचा प्रतिसाद
गेल्या १० दिवसांत कृषी वीजबिलांचे पावणेअकरा कोटी जमा
जळगाव : वीजपुरवठा खंडित केलेल्या कृषी ग्राहकांची वीज जोडणी पूर्ववत करण्याची तसेच आगामी ३ महिने कृषिपंपांचा वीजपुरवठा खंडित न करण्याची घोषणा ऊर्जामंत्री डॉ.नितीन राऊत यांनी १५ मार्च रोजी विधिमंडळात केली होती. त्याबरोबरच महावितरणला आर्थिक अडचणीतून दिलासा देण्यासाठी शेतकऱ्यांनी वीजबिले भरण्याचे आवाहनही त्यांनी केले होते. त्यास सकारात्मक प्रतिसाद देत खान्देशातील शेतकऱ्यांनी गेल्या १० दिवसांत कृषी वीजबिलांचे तब्बल १० कोटी ७० लाख रुपये भरले आहेत.