ऊर्दू शायर जफर गोरखपूरी यांना भावपुर्ण श्रध्दांजली !

0

जळगाव । प्रख्यात ऊर्दू शायर जफर गोरखपूरी यांना बज्मे अदब अलफैज फाऊंडेशनच्यावतीने श्रध्दांजली अर्पण करण्यात आली. जफर मरहूम 1986 मध्ये जळगाव आले होते. डॉ.अ.करीम सालार यांनी मै ऐसा रंग हॅूं दिवार का अपनी, अगर निकला तो घरवालों की नादानी से निकलुंगा शेर उद्धृत केला. कार्यक्रमात रशीद कासमी, कय्युम असर, मोईनोद्दीन उस्मानी, डॉ.शुजा सैय्यद, जावेद अन्सारी, मुश्ताक करीमी, वहीद अन्सारी यांनी मनोगत व्यक्त केले. अनीस कैफी मुश्ताक साहिल, अख्लाक निजामी यांची उपस्थिती होती. अलफैजचे अध्यक्ष अ.अजीज सालार, प्रो.मुजमिल नदवी, प्रा.इब्राहीम पिंजारी उपस्थित होते.